मुंबई, 15 मार्च- बॉलिवूड अभिनेता अभय देओल नेहमी धर्मेंद्र यांना ‘बाबा’ आणि अजित देओल यांना ‘काका’ म्हणत असल्यामुळे धर्मेंन्द्रना तीन मुले आहेत असं प्रत्येकाला वाटायचं. परंतु असं नाहीय, अभय हा धर्मेंद्र यांचा भाऊ अजित देओल यांचा मुलगा आहे. यामागे एक अतिशय रंजक गोष्ट आहे, जी स्वतः अभयने एकदा अभिनेत्री सिमी ग्रेवालच्या शोबद्दल सांगितली होती. अभय या शोमध्ये म्हणाला होता की, तो त्याच्या आईला उषा आंटी नावाने हाक मारतो. यामागे काही खास कारण नव्हते, पण त्याच्या आजीने हे सर्व ठरवलं होतं. धर्मेंद्र हे त्यांच्या कुटुंबातील सर्वात मोठा मुलगा होते. कुटुंबाच्या प्रत्येक सुख-दु:खात त्यांनी कुटुंबाच्या पाठीशी उभं राहून वडिलांची भूमिका निभावली आहे. म्हणूनच ते सर्वांचे पिताआहेत. असं त्यांची आजी नातवंडांना नेहमी म्हणायची. त्यामुळेच अभय धर्मेंद्र यांना काकाऐवजी बाबा म्हणून बोलावतो. (हे वाचा: सलमान खानच्या गर्लफ्रेंडसोबत लग्न, बाप बनताच दिला घटस्फोट; आता तब्बूचा भावोजी बनून जगतोय असं आयुष्य ) अभयने सिमी ग्रेवाल यांच्या शोमध्ये आपण आपल्या कुटुंबाची एक परंपरा मोडल्याचंही सांगितलं होतं. यावेळी बोलताना अभयने म्हटलेलं, माझा मोठा भाऊ आणि कुटुंबातील इतरांनी घरच्यांच्या संमतीने लग्न करुन आपला संसार थाटला होता. मात्र तो गर्लफ्रेंड प्रीती देसाईसोबत बराच काळ लिव्ह-इनमध्ये राहात होता. त्यांनी कधीही त्यांचं नातं लपवलं नव्हतं.
अभय-प्रीती सुमारे 4 वर्षे लिव्ह-इनमध्ये राहात होते. परंतु 2014 मध्ये दोघांचं ब्रेकअप झालं. त्यांच्या ब्रेकअपचं मुख्य कारण लग्न असल्याचं सांगितलं जातं. प्रीतीला लग्न करायचं होतं. मात्र अभयचा लग्नावर विश्वास नव्हता. लग्न हा शब्द त्यांच्यासाठी योग्य नाही असं अभिनेत्याला वाटायचं. त्याला कोणत्याही नात्यात बांधून राहायचं नव्हतं. त्यामुळे त्यांनी ब्रेकअप केल्याचं सांगितलं जातं.
‘हिंदुस्तान टाईम्स’ला दिलेल्या एका मुलाखतीत, अभयने आपल्या फिल्मी करिअरबद्दलसंवाद साधला होता, त्यादरम्यान त्याने सांगितलं होतं की, बॉलिवूडचे अनेक लोक म्हणतात की तो इंडस्ट्रीमध्ये एक मिसफिट व्यक्तिमत्व आहे. याशिवाय त्याने आणखी एक धक्कादायक खुलासा केला होता. एकदा एका दिग्दर्शकाने सर्वांसमोर त्याला कानाखाली मारत त्याचा अपमान केला होता आणि त्याच्याबद्दल खोटी अफवा पसरवली होती’. आता अभिनेत्याला इंडस्ट्रीत 18 वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र आजही त्याला करिअरचा हवा तो मार्ग मिळालेला नाहीय.