जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Dharmaveer Trailer Launch: 'डोक्यात जिहाद घेऊन जगणारा...', चाहत्यांच्या पसंतीस उतरतोय धर्मवीरचा ट्रेलर

Dharmaveer Trailer Launch: 'डोक्यात जिहाद घेऊन जगणारा...', चाहत्यांच्या पसंतीस उतरतोय धर्मवीरचा ट्रेलर

Dharmaveer Trailer Launch: 'डोक्यात जिहाद घेऊन जगणारा...', चाहत्यांच्या पसंतीस उतरतोय धर्मवीरचा ट्रेलर

Dharmaveer Trailer Launch: शिवसेना पक्षातील एक मोठं व्यक्तिमत्त्व आनंद दिघे यांच्यावर आधारित या सिनेमाचं दिग्दर्शन अभिनेता प्रवीण तरडे याने केलं आहे. दरम्यान मराठीतील या मोस्ट अवेटेड सिनेमाचा ट्रेलर आज चाहत्यांसाठी लाँच करण्यात आला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 11 मे: प्रसाद ओक स्टारर ‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ (Prasad Oak Movie Dharmaveer) हा सिनेमा 13 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. शिवसेना पक्षातील एक मोठं व्यक्तिमत्त्व आनंद दिघे यांच्यावर आधारित या सिनेमाचं दिग्दर्शन अभिनेता प्रवीण तरडे याने केलं आहे. दरम्यान मराठीतील या मोस्ट अवेटेड सिनेमाचा ट्रेलर (Dharmaveer Trailer Launch) आज चाहत्यांसाठी लाँच करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ (Dharmaveer Mukkam Post Thane) या सिनेमाचा ट्रेलर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लाँच झाला होता. या सोहळ्याला बॉलिवूड सूपरस्टार अभिनेता सलमान खान देखील हजर होता. आता युट्यूबवर देखील हा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. धर्मवीर सिनेमातील आधी रीलिज झालेल्या गाण्यांना ज्याप्रमाणे काही वेळातच करोडो Views मिळाले, त्याचप्रमाणे ट्रेलरही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. यामध्ये आनंद दिघेंप्रमाणे हुबेहूब वावर करणारा प्रसाद ओक अनेकांना भावला आहे. यातील डायलॉग्जवर देखील प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. ‘जिथे धर्म तिथे विजय’ अशा डायलॉगने या ट्रेलरची सुरुवात होते आहे. त्यानंतर ‘आनंद दिघे जिंदाबाद’च्या घोषणा ऐकू येत असतानाच प्रसाद ओकची एंट्री होते. या ट्रेलरमध्ये आनंद दिघेंचे वेगवेगळे पैलू दाखवण्यात आले आहेत. ठाण्यात भरणाऱ्या त्यांच्या दरबाराबाबतचे दृश्य या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे. आनंद दिघे यांना राखी बांधण्यासाठी रांगा लागायच्या, ते दृश्यही यामध्ये आहे. याशिवाय धर्मवीर टायटल साँगची झलकही या ट्रेलरमध्ये ऐकायला मिळते आहे. या ट्रेलरच्या शेवटी एक वाक्य आहे, ज्यातून प्रसाद ओकच्या कसलेल्या अभिनयाची चुणूक स्पष्टपणे दिसते आहे. ते वाक्य असं की, ‘डोक्यावर टोपी घालून फिरणारा नाही, डोक्यात जिहाद घेऊन फिरणारा मुसलमान आपला शत्रू आहे. बाकी सगळे आपलेच.’ या शेवटच्या डायलॉगसाठी चाहत्यांच्या चांगल्या कमेंट्सही येत आहेत. ‘प्रसाद ओक दिघे साहेब जगले आहेत’, ‘शेवटचा डायलॉग मन जिंकणार होता’, ‘हा सिनेमा ब्लॉकबस्टर होणार’, अशा काही कमेंट्स युट्यूबवरील कमेंट सेक्शनमध्ये आल्या आहेत. त्यामुळे चाहते नक्कीच हा सिनेमा पाहण्यासाठी उत्सुक आहेत हे मात्र खरं.

धर्मवीर सिनेमाने रीलिजच्या आधीही काही रेकॉर्ड केले आहेत. महाराष्ट्रातील विविध भागात या सिनेमाच्या पोस्टरचे 30 फुटी होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. पण या मुंबईच्या वांद्रे येथील पश्चिम द्रुतगती मार्गावरील होर्डिंगने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. हे होर्डिंग आशियातील सर्वात मोठे होर्डिंग असून ते 16800 स्क्वेअर फुट आकाराचे आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार याठिकाणी कधी मराठी मुव्हीचे पोस्टर झळकले नव्हते, पण धर्मवीरने हा इतिहास घडवला आहे. ‘देऊळ बंद’, ‘मुळशी पॅटर्न’ यांसारख्या गाजलेल्या आणि बहुचर्चित आगामी ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटानंतर प्रविण तरडे (Pravin Tarde) आता हा ‘धर्मवीर’ हा सिनेमा घेऊन येत आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन स्वतः प्रवीण करणार आहेत. तर झी स्टुडिओज, साहिल मोशन आर्ट्स आणि मंगेश देसाईंनी या सिनेमाच्या निर्मितीची जबाबदारी उचलली आहे. अभिनेता प्रसाद ओक आनंद दिघेंची भूमिका साकारत असून प्रसादचा पहिला लुकसमोर आल्यापासून चाहते उत्सुक आहेत

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात