मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

धनुष-ऐश्वर्या यांच्या घटस्फोटवर सासरे कस्तूरी राज यांची प्रतिक्रिया; म्हणाले, हा घटस्फोट नव्हे तर...

धनुष-ऐश्वर्या यांच्या घटस्फोटवर सासरे कस्तूरी राज यांची प्रतिक्रिया; म्हणाले, हा घटस्फोट नव्हे तर...

Dhanush and Ashwarya Rajinikanth Divorce

Dhanush and Ashwarya Rajinikanth Divorce

अभिनेता धनुष आणि ऐश्वर्या हे दोघं सुमारे 18 वर्षांपूर्वी विवाहबंधनात अडकले होते. आपण विभक्त होत असल्याची घोषणा सोमवारी धनुषनं सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून केली. यानंतर त्याचे वडिल कस्तुरी राजा यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Dhanshri Otari

नवी दिल्ली, 20 जानेवारी: नागा चैतन्य आणि समंथा (Naga Chaitanya and Samantha Divorce) यांच्या घटस्फोटनंतर आता दाक्षिणात्य सिनेसृष्टीतला आघाडीचा अभिनेता धनुष (Dhanush and Ashwarya Rajinikanth Divorce) आणि ऐश्वर्या रजनीकांत हे दोघेदेखील विभक्त झाले आहेत. दरम्यना, धनुषचे वडील आणि तमिळ चित्रपट निर्माते कस्तुरी राजा (Kasthuri Raja)  दोघाच्या या निर्णयावर प्रतिक्रीया दिली आहे.

अभिनेता धनुष आणि ऐश्वर्या हे दोघं सुमारे 18 वर्षांपूर्वी विवाहबंधनात अडकले होते. आपण विभक्त होत असल्याची घोषणा सोमवारी धनुषनं सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून केली. यानंतर सिनेसृष्टीतून संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या.

दरम्यान, धनुषचे वडील कस्तुरी राजा यांनी एक वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले, धनुष आणि ऐश्वर्याचे वेगळे होण्याचे एकमेव कारण म्हणजे मतभेद आहे. हे कौटुंबिक कलह आहे, सहसा विवाहित जोडप्यांमध्ये होतो तसाच, अगती सामान्य. अर्थात हा घटस्फोट नाही. धनुष आणि ऐश्वर्या सध्या चेन्नईत नाहीत. दोघेही हैदराबादमध्ये आहेत. मी त्या दोघांशी फोनवर बोललो आहे आणि त्या दोघांना काही सल्ले दिले आहेत.

सोशल पोस्ट लिहित धनुषने विभक्त होत असल्याची दिली होती माहिती

'18 वर्षांचा सहवास, मैत्री, कपल, पालक आणि एकमेकांचे हितचिंतक बनत आम्ही समजूतदारपणे एकत्र प्रवास केला. आज आम्ही जिथे उभे आहोत, तिथे आमचे मार्ग वेगळे होत आहेत. मी आणि ऐश्वर्यानं विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. एकमेकांपासून वेगळे होऊन आम्ही स्वतःला शोधू. कृपया आमच्या निर्णयाचा आदर करा आणि आमची प्रायव्हसी लक्षात घेऊन, आम्हाला हे सर्व हाताळू द्या.'

धनुषचे खरे नाव व्यंकटेश प्रभू कस्तुरी राजा आहे. त्यांच्या वडिलांचे नाव कस्तुरी राजा आणि आईचे नाव विजयालक्ष्मी आहे. धनुषचे वडील आणि भाऊ चित्रपट निर्माते आहेत.

First published:

Tags: Entertainment, Rajnikant, Superstar rajnikant