जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Tu Chal Pudha: वहिनीसाहेबांचं छोट्या पडद्यावर पुनरागमन! धनश्री काडगावकर पुन्हा साकारणार दमदार खलनायिका

Tu Chal Pudha: वहिनीसाहेबांचं छोट्या पडद्यावर पुनरागमन! धनश्री काडगावकर पुन्हा साकारणार दमदार खलनायिका

Tu Chal Pudha: वहिनीसाहेबांचं छोट्या पडद्यावर पुनरागमन! धनश्री काडगावकर पुन्हा साकारणार दमदार खलनायिका

‘डोक्यात काय फॉल्टय काय?’ असं ठसक्यात म्हणणाऱ्या ‘तुझ्यात जीव रंगला’ मधील वहिनीसाहेब आता नवीन भूमिकेत प्रेक्षकांच्या मनावर राज्य करण्यासाठी सज्ज आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 12 जुलै: अभिनेत्री धनश्री काडगावकर (Dhanashree Kadgaonkar) पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाली आहे. लवकरच ती एका नव्या कोऱ्या भूमिकेत प्रेक्षकांना भेटायला येणार आहे. झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवर येत्या १५ ऑगस्टपासून ‘तू चाल पुढं’ ( Tu Chal Pudhe) हि मालिका सुरु होत आहे. याच मालिकेत धनश्री काडगावकर महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.‘डोक्यात काय फॉल्टय काय?’ असं ठसक्यात  म्हणणाऱ्या वहिनीसाहेब आता नवीन भूमिकेत दमदार खलनायिका साकारण्यास सज्ज झाल्या आहेत. धनश्रीने तिच्या सोशल मीडियावरून मालिकेचा प्रोमो शेअर करत चाहत्यांना हि आनंदाची बातमी दिली आहे. हि पोस्ट शेअर करताना धनश्रीने लिहिलंय कि,‘एका मोठ्या ब्रेकनंतर एक नवं character  घेऊन येत आहे, तुमचं प्रेम असंच राहू द्या’, अशा शब्दांमध्ये तिने भावना व्यक्त केल्या आहेत. या मालिकेत धनश्रीची भूमिका काय असेल हे अजून स्पष्ट झालेलं नाही. पण झी मराठीने या नवीन मालिकेच्या प्रदर्शित केलेल्या प्रोमोमध्ये धनश्रीच्या भूमिकेला खलनायिकेची छटा आहे असं दिसतंय.

जाहिरात

हेही वाचा -   TV गाजवल्यानंतर अंकुश चौधरीच्या बायकोचं मराठी टेलिव्हिजनवर जोरदार कमबॅक! अभिनेत्री धनश्री काडगावकरने याआधी झी मराठीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतील नंदिता म्हणजेच वहिनीसाहेबांची भूमिका साकारली होती. तिची हि खलनायिकेची भूमिका चांगलीच लोकप्रिय झाली होती. अभिनेत्री धनश्री काडगावकरने साकारलेल्या या वाहिनीसाहेब प्रेक्षकांच्या मनावर अजूनही राज्य करत आहेत. वहिनीसाहेबांचे कोल्हापुरी ठसका असलेले डायलॉग प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहेत. नुकताच वहिनीसाहेबांचा म्हणजेच धनश्रीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. दरम्यान धनश्री एका नव्या भूमिकेत दिसणार असल्याने तिचे चाहते प्रचंड उत्सुक आहेत. तिने सोशल मीडियावरती शेअर केलेल्या पोस्टवर तिच्या चाहत्यांनी तसेच कलाकार मित्रांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. धनश्रीने आतापर्यंत ‘तुझ्यात जीव रंगला’, ‘गंध फुलांचा गेला सांगून’, माझिया प्रियाला प्रीत कळेना या मालिकांमधून विविध भूमिका साकारल्या आहेत. आता ‘तू चाल पुढं’ मालिकेत तिला पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात