जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Kiran Gaikwad: 'देवमाणूस' फेम किरण गायकवाड सध्या काय करतो? अभिनेत्याला ओळखणंही झालं कठीण

Kiran Gaikwad: 'देवमाणूस' फेम किरण गायकवाड सध्या काय करतो? अभिनेत्याला ओळखणंही झालं कठीण

किरण गायकवाड

किरण गायकवाड

Devmanus Fame Kiran Gaikwad: मराठी मालिका सध्या चांगल्याच लोकप्रिय ठरत आहेत. यामधीलच एक मालिका म्हणजे ‘देवमाणूस’ होय. या मालिकेने आता प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी मालिका प्रचंड गाजली होती.

  • -MIN READ Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 4 मार्च- मराठी मालिका सध्या चांगल्याच लोकप्रिय ठरत आहेत. यामधीलच एक मालिका म्हणजे ‘देवमाणूस’ होय. या मालिकेने आता प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी मालिका प्रचंड गाजली होती. या सस्पेन्स थ्रिलर मालिकेने प्रेक्षकांना खिळवून ठेवलं होतं. तुफान लोकप्रियतेनंतर मालिकेचा दुसरा भागही भेटीला आला होता. ‘देवमाणूस’ मधून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचणारा डॉक्टर अजितकुमार देव म्हणजेच अभिनेता किरण गायकवाड प्रेक्षकांचा प्रचंड लाडका झाला आहे.म्हणूनच चाहते त्याच्याबाबत अपडेट्स जाणून घ्यायला सतत उत्सुक असतात. किरण सध्या पडद्यावर दिसत नसल्याने त्याचे चाहते त्याला मिस करत आहेत. ‘देवमाणूस’ या मालिकेत किरणची भूमिका जरी नकारात्मक होती तरी प्रेक्षक मात्र किरणवर भरभरून प्रेम करतात. यापूर्वी किरणने साकारलेल्या ‘लागीरं झालं जी’ मालिकेतील भैय्यासाहेब या पात्रालासुद्धा प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दिलं होतं. या मालिकेतील त्याच्या अभिनयाचं प्रचंड कौतुक झालं होत.किरण गायकवाड सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रीय असतो.तो सतत नवनवीन व्हिडीओ आणि फोटो शेअर करुन चाहत्यांचं मनोरंजन करत असतो. चाहतेही त्याच्या पोस्टला प्रचंड प्रतिसाद देत असतात. (हे वाचा: Aai Kuthe Kay Karte: सवत अरुंधतीच्या लग्नासाठी नटली संजना; तिच्यासमोर नवरीही पडली फिकी ) मात्र किरण गायकवाड पडद्यावर दिसत नसल्याने बरेच लोक निराश होतात. सोशल मीडियावर सक्रिय नसणारे त्याचे चाहते तो सध्या कुठे आहे? काय करतोय? हे जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. त्यामुळेच आम्ही तुम्हाला आज किरणबाबतीत नवी अपडेट देणार आहोत. परंतु अभिनेत्याला त्याच्या या नव्या व्हिडीओमध्ये त्याला ओळखणंदेखील कठीण झालं आहे. पाहूया काय आहे नेमका व्हिडीओ.

किरण गायकवाड सध्या जास्तीत-जास्त आपल्या युट्युब चॅनेलवर सक्रिय असतो. तो सतत ठिकठिकाणी भटकंती करत असतो. या प्रवासाचे व्हिडीओ तो चाहत्यांसाठी शेअर करत असतो. नुकतंच अभिनेत्याने आपला एक व्हिडीओ शेअर केला आहे, जो सध्या प्रचंड चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेता महाराष्ट्रातील तरुणांईंचं आकर्षणाचं केंद्र असणाऱ्या देवकुंड धबधब्याजवळ भटकंती करताना दिसून येत आहे. सर्वसामान्यपणे याठिकाणी जाणारे लोक पाण्यात भिजत ट्रिपचा आनंद घेत असतात. परंतु भर उन्हाळ्यात गेल्याने किरणला भिजत नव्हे तर भाजत देवकुंड पाहावा लागल्याचं त्याने मजेशीर अंदाजात म्हटलं आहे.

News18लोकमत
News18लोकमत

या व्हिडीओमध्ये किरण गायकवाडला पहिल्या नजरते ओळखणं फारच कठीण जात आहे. कारण आजही प्रेक्षकांना ‘देवमाणूस’मधील दाढी असणारा डॉक्टर अजितकुमार लक्षात आहे. मात्र या व्हिडीओमध्ये किरण अगदीच क्लीन शेव्हमध्ये दिसून येत आहे. त्यामुळे पाहताच क्षणी त्याला ओळखणं कठीण आहे. असं अनेकांनी कमेंट्स करत म्हटलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात