मालिकेतील डिंपल (Dimpal) म्हणजेच अभिनेत्री अस्मिता देशमुखने नुकताच एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेयर केला आहे. यामध्ये ती आपला ऑनस्क्रीन भाऊ टोण्यासोबत (Tonya) मजेशीर रील(Reel) बनवताना दिसत आहे.यामध्ये टोण्या एका मुलीला आपल्या बालपणीच्या प्रेमाची आठवण करून देताना दिसत आहे.तर त्याचं हे प्रकरण डिंपल मागे पाहात आहे. असा हा मजेशीर रील आहे. या बहीण भावाची ही धम्माल चाहत्यांना खुपचं पसंत पडत आहे. (हे वाचा: समांतरनं रचला इतिहास; पहिल्यांदाच मराठी वेब सीरिजनं नोंदवला विक्रम ) ‘देवमाणूस’ मालिकेतील कलाकार ऑफस्क्रीन खूप धम्माल करत असतात. हे सर्व कलाकार मिळून दररोज असे मजेशीर रील्स चाहत्यांसाठी शेयर करत असतात. तसेच धम्माल डान्ससुद्धा करत असतात. या कलाकारांचे सेटवरचे असे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतं असतात. आणि या कलाकरांना चाहत्यांकडून तितकचं प्रेम मिळत असतं. (हे वाचा:अखेर राहुल - दिशाचं झालं शुभमंगल; धुमधडाक्यात पार पडला सोहळा; पाहा Videos ) सध्या मालिकेमध्ये खुपचं इंटरेस्टींग भाग सुरु आहे. दिव्या आणि आर्या जितके पुरावे कोर्टात सादर केले त्या सर्वांना डॉक्टरने आपल्या धूर्त बुद्धीने चुकीचं ठरवलं आहे. आत्ता तर कोर्टाने त्याला निर्दोषसुद्धा जाहीर केलं आहे. मात्र एका स्त्रीच्या येण्याने डॉक्टरची चक्क शुद्धचं हरपते. आत्ता मालिकेत हे कोणत नवं वळण आहे यासाठी चाहते उत्सुक झाले आहेत. डॉक्टर खरंच सुटणार की त्या स्त्रीच्या येण्याने त्याला फाशी मिळणार याकडे दर्शकांचं लक्ष लागलं आहे.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.