मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Devmanus मधील 'डिम्पल' दिसणार या नव्या अल्बममध्ये

Devmanus मधील 'डिम्पल' दिसणार या नव्या अल्बममध्ये

देवमाणूस मालिकेतली डिम्पल म्हणजेच अभिनेत्री अस्मिता देशमुख एका नव्या म्युझिक अल्बम मधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

देवमाणूस मालिकेतली डिम्पल म्हणजेच अभिनेत्री अस्मिता देशमुख एका नव्या म्युझिक अल्बम मधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

देवमाणूस मालिकेतली डिम्पल म्हणजेच अभिनेत्री अस्मिता देशमुख एका नव्या म्युझिक अल्बम मधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

मुंबई, 2 एप्रिल : देवमाणूस (Devmanus Marathi Serial) या झी मराठी (zee Marathi) वरील मालिकेतून घराघरात पोहोचलेली डिम्पल (Dimple) म्हणजेच अभिनेत्री अस्मिता देशमुख (Asmita Deshmukh) एका नव्या गाण्यात दिसणार आहे. अस्मिता ने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंट (Instagaram account) वर फोटो शेअर करत या बद्दल माहिती दिली.

अस्मिता तिच्या मालिकेतील भूमिकेमुळे फारच चर्चेत आहे. तर तिच्या भूमिकेला भरभरून दाद देखील मिळत आहे. तर आता तिचा नवा अल्बम येत आहे. एव्हरेस्ट एंन्टरटेन्मेट (Everest Entertainment) चा हा अल्बम असून ‘खुळ लागलं’ (Khul lagla) असं या गाण्याचं नाव आहे. तिच्या चाहत्यांनी तिला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.

अस्मिता सध्या देवमाणूस या झी मराठी वाहिनी वरील मालिकेत काम करत आहे. मालिका चांगलीच हिट ठरत असून डिम्पल या पात्राला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. देवमाणूस ही अस्मिताची पहिलीच मालिका असून या आधी तिने काही नाटकांमधे आणि व्हिडीओ अल्बम मधे काम केलं आहे.

रात्रीस खेळ चाले: शेवंता कधी येणार? दिवस केला जाहीर; पाहा काय आहे संदेश

अभिनया व्यतिरिक्त अस्मिता गायिका देखील आहे. तिला गायला आवडतं. तिच्या सोशल मिडीया (social media) अकाऊंट वर ती सतत सक्रिय असते. मजेशीर व्हिडीयो ती इन्स्टाग्राम अकाऊंट वर पोस्ट करत असते.

मालिकेत डिम्पल डॉक्टर अर्थात देवी सिंगला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करत आहे. पण डॉक्टरच तिला मारण्याची धमकी देतो. तर डिम्पल आणि डॉक्टर यांच्या लग्नाचीही बोलणी सुरू आहे. तेव्हा डॉक्टर आणि डिम्पलचं खरच लग्न होणार की, डॉक्टर डिम्पल ला ही संपवणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

First published:

Tags: Marathi actress, Marathi entertainment