जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Devmanus 2 मध्ये मोठा ट्विस्ट! जामकरांपुढे येणार देवमाणसाचं मोठं सत्य; मुंबईत भेटणारी 'ती' महत्त्वाची व्यक्ती

Devmanus 2 मध्ये मोठा ट्विस्ट! जामकरांपुढे येणार देवमाणसाचं मोठं सत्य; मुंबईत भेटणारी 'ती' महत्त्वाची व्यक्ती

Devmanus 2 zee marathi serial

Devmanus 2 zee marathi serial

लवकरच अजितकुमारचा खेळ संपणार आहे. कारण जामकरसमोर खऱ्या डॉक्टर अजितकुमारचा केव्हाच मृत्यू झाला आहे हे सत्य उलगडणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 08 जुलै:  झी मराठीच्या ( Zee Marathi) देवमाणूस 2 ( Devmanus 2) या मालिका आता उत्कंठावर्धक वळणावर पोहचली आहे. इन्स्पेक्टर जामकरांपुढे अजितकुमारचं ( Ajitkumar Deo) खरं रूप लवकरच येणार असं दिसतंय.  अभिनेते मिलिंद शिंदे (Milind Shinde)  मालिकेत मार्तंड जामकर या पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहेत. त्यांच्या एन्ट्रीनंतर ही मालिका नव्यानं चर्चेत आली आहे. जामकर हा पोलीस अधिकारी सुरुवातीपासूनच डॉक्टरच्या मागावर आहे. पण त्याला अजितकुमारविषयी ठोस पुरावे काही आतापर्यंत मिळाले नाहीत. कारण जामकरला डॉक्टरचे सत्य कळाले तर मालिकेत काही मजा राहणार नाही. पण आता मात्र लवकरच अजितकुमारचा खेळ संपणार आहे. कारण जामकरसमोर खऱ्या डॉक्टर अजितकुमारचा केव्हाच  मृत्यू झाला आहे हे सत्य उलगडणार आहे. झी मराठीने नुकत्याच प्रदर्शित केलेल्या प्रोमोनुसार, जामकर अजितकुमारचं सत्य शोधण्यासाठी मुंबईत पोहचला  आहे. तिथे तो एका दवाखान्यात जातो. तिथे डॉक्टर अजितकुमारच्या फोटोला घातलेला हार पाहून चकित होतो. आणि तो अजितकुमारविषयी चौकशी करतो. तेव्हा खऱ्या अजितकुमारची होणारी पत्नी इन्स्पेक्टर जामकरला तिथे भेटते. तीच डॉक्टर अजितकुमारचा मृत्यू झाला आहे हे सत्य जामकरला सांगते. तेव्हा आता इन्स्पेक्टर जामकर पुढे कोणतं पाऊल उचलणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. तसेच डॉक्टर अजितकुमारचं  सोंग करणारा व्यक्ती मग नेमका कोण आहे आणि जामकर त्या देवमाणसाचा कसा पर्दाफाश करतो याची आता प्रेक्षकांना उत्सुकता आहे. हेही वाचा - ‘अभिलाषा’ची सुंदरा मनामध्ये भरली मालिकेतून एक्झिट? शेअर केली खास पोस्ट

जाहिरात

दरम्यान, देवमाणूस 2 मध्ये चला होऊ द्या फेम स्नेहल शिदमची मार्तंड जामकरची पत्नी म्हणून एन्ट्री झाली आहे.  ‘चला हवा येऊ द्या’ची ब्लॅक ब्युटी म्हणून प्रसिद्ध असलेली स्नेहल मालिकेमध्ये नेमका कोणता नवीन ट्वीस्ट आणतेय हे पाहणं रंजक ठरेल. कारण झी मराठीने नवीन प्रदर्शित केलेल्या प्रोमोमध्ये जामकर त्यांच्या पत्नीला जेव्हा मुंबईला जाण्याबद्दल सांगतात तेव्हा ती सुद्धा ‘मी मुंबईला येणार म्हणजे येणार’ म्हणत जामकरांच्या मागे लागते. त्यामुळे आता तिची भूमिका नेमकी काय आहे, याबद्द्ल चर्चा सुरू झाली आहे. मध्यंतरीच्या काळात देवमाणूस सिझन 2 ने चाहत्यांची निराशा केली होती. त्यामुळे त्याची लोकप्रियता सुद्धा कमी झाली होती. मात्र आता इन्स्पेक्टर जामकरने मालिकेत एन्ट्री घेतल्यापासून मालिकेला वेगळे वळण लागले आहे आणि हा ट्रॅक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात