7 मिनिटांच्या प्रोमोमध्ये जामकर सोनूने मृत्यूने लिहिलेली चिठ्ठी कोर्टात वाचून दाखवतात. चिठ्ठीत असे लिहिलेलं असते की, प्रिय आई, मी आता डॉक्टरांशिवाय राहू शकत नाही. मला तुला एकट सोडून जायचं नाही पण माझा नाइलाज आहे. या चिठ्ठीनंतर अजितकुमारसह कोर्टातील सगळ्यांच्यात भुवया उंचावल्या आहेत. चिठ्ठी कोर्टासमोर सादर केल्यानंतर जामकर अजितकुमारच्या 14 दिवसांच्या तुरुंगातील कोठडीची मागणी करतात आणि ती मागणी कोर्ट मंजूर करते. शेवटी मार्तंड अजितकुमारला तुला भूतकाळ एकत्र घालवायचा आहे म्हणत कानशिलात लगावतात. प्रोमो वरुनतरी अजित कुमारला पुन्हा एकदा अटक होणार हे समोर आलं आहे. परंतु 14 दिवसांची शिक्षा भोगून अजितकुमार पुन्हा बाहेर येणार? की कथानकात आणखी काही ट्विस्ट येणार याकडे सर्व प्रेक्षकांचं लक्ष आहे. देवमाणूसच्या पहिल्या सिझनमध्ये देखील अजितकुमारला अटक झाल्यानंतर तो सहिसलामत बाहेर पडला होता. यावेळी मार्तंड जामकरांनी घेतलेली मेहनत सफल होणार का हे मालिकेच्या येत्या भागात कळणार आहे.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Zee Marathi, Zee marathi serial