अमृता फडणवीसांनी फेस्टिव्हलच्या पहिल्या दिवशी फोटो पोस्ट करत त्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाल्याचं सांगितलं.
अमृता फडणवीसांनी रेड कार्पेट एंट्रीसाठी खास ब्लॅक कलरचा स्टायलिश आऊटफिट घातला होता. ज्याची तूफान चर्चा रंगलेली पाहायला मिळतेय.
कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये अमृता फडणवीस अन्न, आरोग्य आणि शाश्वत विकास या विषयातील जागृकतेसाठी बेटर वर्ल्ड फंडने आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या.
अमृता फडणवीसांसह डॉमिनिक ओयुटारा, राजकुमारी धिदा तलाल, अभिनेता शारोन स्टोन, चार्ली चॅप्लिन यांनी नात कायरा चॅप्लिनही उपस्थित होत्या.
यंदाच्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये भारतीय अभिनेत्रींइतकीच चर्चा अमृता फडणवीस यांच्या लुकविषयी होत आहे.