मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /नवाज आणि आलिया पुन्हा आले एकत्र; घटस्फोटाचा निर्णय घेतला मागे, कारण...

नवाज आणि आलिया पुन्हा आले एकत्र; घटस्फोटाचा निर्णय घेतला मागे, कारण...

आलियानं नवाजच्या कुटुंबीयांविरोधात कोर्टाचा दरवाजा देखील ठोठावला होता. परंतु आता तिनं आपली भूमिका बदलली आहे. तिनं नव्यानं आयुष्य सुरु करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

आलियानं नवाजच्या कुटुंबीयांविरोधात कोर्टाचा दरवाजा देखील ठोठावला होता. परंतु आता तिनं आपली भूमिका बदलली आहे. तिनं नव्यानं आयुष्य सुरु करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

आलियानं नवाजच्या कुटुंबीयांविरोधात कोर्टाचा दरवाजा देखील ठोठावला होता. परंतु आता तिनं आपली भूमिका बदलली आहे. तिनं नव्यानं आयुष्य सुरु करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

मुंबई 6 मार्च: प्रसिद्ध अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकीचं (Nawazuddin Siddiqui) आयुष्य गेल्या काही काळात ढवळून निघालं होतं. त्याची पत्नी आलिया (Aaliya) हिनं कौटुंबीक हिंसाचाराचे आरोप करत घटस्फोटाची मागणी केली होती. हे प्रकरण इतकं पुढे गेलं होतं की तिनं नवाजच्या कुटुंबीयांविरोधात कोर्टाचा दरवाजा देखील ठोठावला होता. परंतु आता तिनं आपली भूमिका बदलली आहे. आलियानं नवाजसोबत नव्यानं आयुष्य सुरु करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. (Aaliya wants to reconcile for their children)

आलियानं इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत आपल्या बदललेल्या भूमिकेवर भाष्य केलं. ती म्हणाली, “गेल्या काही काळात नवाजच्या स्वभावात अमुलाग्र बदल झाला आहे. मला आणि माझ्या मुलांना कोरोनाची लागण झाली होती. त्यावेळी त्यानं आमची भरपूर काळजी घेतली. तो चित्रीकरणात व्यस्त होता तरी मुलांचं शिक्षणाकडे त्याचं लक्ष होतं. कोरोनामुळं तो देखील काही काळ आयसोलेशमध्ये होता. त्यावेळी आम्ही आमच्यात झालेल्या वादावर पुन्हा एकदा विचार केला. मुळ समस्या काय आहे हे शोधून काढलं. सध्या आम्ही आमचे वाद बाजूला सारुन मुलांच्या पालनपोषणावर लक्ष केंद्रित करत आहोत. मुलांसाठी आम्ही पुन्हा एकदा नव्याने संसार सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.”

नवाजुद्दीन आणि आलिया यांच्या लग्नाला दहाहून अधिक वर्षे झाली आहेत. या दोघांना दोन मुलं आहेत. 2017 मध्येही दोघांच्या वैवाहिक आयुष्यात चढउतार आले. मात्र अनेकदा त्यांनी घटस्फोटाचा निर्णय मागे घेतल्याचं कळतंय. यापूर्वी ‘एबीपी न्यूज’ला दिलेल्या मुलाखती आलिया म्हणाली होती, “नवाजशी घटस्फोट घेण्यामागे एक नाही तर अनेक कारणं आहेत आणि ही सगळी कारणं गंभीर आहेत. लग्नाच्या एक वर्षानंतर 2010 पासून नवाज आणि माझ्यात मतभेद सुरू झाले. मी प्रत्येक गोष्ट सांभाळून घेत होती. मात्र आता माझ्याकडून सहन होणार नाही. ” दरम्यान तिनं आपलं नाव बदलून अंजना आनंद किशोर पांडे असं नाव ठेवलं होतं.

First published:

Tags: Divorce, Entertainment, Marathi entertainment