मुंबई, 7 मार्च- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस सोशल मीडियावर चांगल्याच सक्रीय असाता.त्या विविध प्रकारच्या कार्यक्रमांना हजेरी लावतात. तसेच त्या अनेक मुद्द्यांवर त्यांचं मतंही मांडत असतात. अमृता यांच्या अनेक पोस्ट सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे लक्षवेधून घेत असतात. अनेकदा सोशल मीडियावर त्यांच्या पोस्टमुळे ट्रोल देखील होत असतात. नुकताच अमृता यांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.अमृता यांनी लेकीसोबत हटक्या स्टाईलनं सर्वांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अमृता यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांच्यासोबत त्यांची लेक देखील दिसत आहे. शिवाय या व्हिडिओमध्ये त्यांच्या खांद्यावरचा पोपट सर्वांचे लक्षवेधून घेत आहे. अमृता त्यांच्या मुलीसह “हॅप्पी होली” बोलत आहेत. तर दोघींच्याही चेहऱ्यावर रंग दिसत आहे. अमृता यांनी त्यांच्या मुलीचा हात हातात पकडला आहे. अमृता यांच्या खांद्यावर पोपटही बसून आहे. त्यांच्या या व्हिडिओला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे.अमृता यांनी हा व्हिडिओ शेअर करत म्हटलं की, “पृथ्वीवरील सगळ्या प्राण्यांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा”. या व्हिडिओनंतर नेटकऱ्यांनी अमृता यांनाही होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. वाचा- होळीच्या दिवशी माहोल मुलींचं भन्नाट रील व्हायरल; ‘या’ अभिनेत्यानेही दिली अशी साथ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आज मुंबईत होळी साजरी केली. तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील ठाण्यातील त्यांच्या निवासस्थानी होळी आणि धूलिवंदन सण मोठ्या उत्साहात साजरा केला.
आज राज्यात धूळवडीची धूम पाहायला मिळते आहे. सोशल मीडिया देखील या रंगात रंगून गेला आहे. मराठी सेलेब्सनी देखील जोरात धूळवड साजरी केली आहे. अनेकांनी सोशल मीडिया पोस्ट करत शुभेच्छा दिल्या आहेत.
अमृता फडणवीस यांना सोशल मीडियावर त्यांच्या गाण्यांवरून ट्रोल करण्यात आलं. पण त्यांनी गाण्याचा छंद जोपसलाच नाही तर त्याचं करिअरमध्ये रूपांतर केलं. त्यांच्या गाण्यांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसतात. सोशल मीडिया असो की स्पॉट लाईटची दुनिया त्या नेहमीच ठामपणे वावरताना दिसतात.