Home /News /entertainment /

‘असे पब्लिसिटी स्टंट पुन्हा करु नका’; जूही चावलाची 5G याचिका कोर्टानं फेटाळली

‘असे पब्लिसिटी स्टंट पुन्हा करु नका’; जूही चावलाची 5G याचिका कोर्टानं फेटाळली

या तंत्रज्ञानामुळं मानवावर आणि पर्यावर्णावर गंभीर परिणाम होण्याचा धोका असल्याचं म्हणत जूही चावलाने हे पाऊल उचललं होतं. मात्र तिची ही याचिका कोर्टानं फेटाळून लावली आहे.

    मुंबई 4 जून: भारतात लवकरच 5G नेटवर्क लॉन्च केलं जाणार आहे. मात्र या नेटवर्कला बॉलिवूड अभिनेत्री जूही चावलानं विरोध केला होता. तिनं दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल करत 5G नेटवर्कला विरोधात आपली नाराजी व्यक्त केली होती. या तंत्रज्ञानामुळं मानवावर आणि पर्यावर्णावर गंभीर परिणाम होण्याचा धोका असल्याचं म्हणत जूही चावलाने हे पाऊल उचललं होतं. मात्र तिची ही याचिका कोर्टानं फेटाळून लावली आहे. न्यायाधीश जे आर मिड्ढा यांनी यांनी जूही चावलाची 5G विरोधातील ही याचिका फेटाळून लावली. तिनं कोर्टात याचिका दाखल करण्यापूर्वी सरकारशी चर्चा करणं अपेक्षित होतं. त्यांना पत्रक पाठवून या प्रकरणी त्यांचं मत काय आहे हे जाणून घेणं अपेक्षित होतं. जर सरकारनं या नव्या तंत्रज्ञानाबाबत कुठलीही माहिती देण्यास नकार दिला असता तर या याचिकेवर विचार करता आला असता असं ते म्हणाले. शिवाय 5G तंत्रज्ञान अजून ट्राय अँड टेस्ट या स्टेजवर आहे. त्याचे विपरित परिणामांबाबत अद्याप कुठलेही ठोस पुरावे जूहीनं सादर केले नाही. त्यामुळं विरोध नेमका कुठल्या गोष्टीला हेच या याचिकेत तिला सांगता आलं नाही. तिनं याचिकेत केवळ अंदाज मांडले आहेत. त्यामुळं तिची याचिका फेटाळून लावण्यात आली. शिवाय अशा अशा प्रकारचे पब्लिसिटी स्टंट पुन्हा करु नये असा इशारा देखील तिला देण्यात आला आहे. निशाच्या जखमा पाहून दीपिका संतापली; करणवर केली जोरदार टीका काय म्हटलं होतं याचिकेमध्ये? 5G विकिरण पृथ्वीवरील पर्यावरणाचं नुकसान करतील जे पुन्हा कधीच भरून काढणं शक्य नसेल. विकल दीपक खोसला यांच्या मदतीने ही याचिका जूही चावलाने दाखल केली होती. 5G नेटवर्कमुळे लोकांचा फायदा होईल यामुळे लोकांच्या आरोग्यावर आणि पर्यावरणावर परिणाम होणार नाही हे दूरसंचार कंपनीने स्पष्ट करावं असं याचिकेत नमूद करण्यात आलं होतं. शिवाय 5G नेटवर्कच्या रेडिएशनमुळे महिला, लहान मुलं, नवजात बालकं तसचं वनस्पती आणि पर्यावरणातील सर्व प्रकारच्या सजीवांवर विकिरणांचा प्रभाव होणार नाही हे दूरसंचार कंपन्यांनी स्पष्ट करावं असं या याचिकेत म्हंटलं होतं.
    Published by:Mandar Gurav
    First published:

    Tags: Bollywood actress, Crime, Delhi high court, Technology

    पुढील बातम्या