23 वर्षीय दीप्ती गेल्या पाच वर्षांपासून षण्मुखसोबत रिलेशनशिपमध्ये होती, परंतु आता नवीन वर्षाच्या दिवशीच तिनं त्याच्यापासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे.
1 जानेवारीला सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताना दीप्ती म्हणाली की खूप विचार आणि समजून घेतल्यानंतर आम्ही नातं संपवत आहोत. "मी आणि षण्मुखने या नात्यातून खूप काळजी घेऊन पुढे जाण्याचा आणि आमच्या वैयक्तिक आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे." त्यामुळं आता आमची रिलेशनिप संपलेली आहे. असं तिनं पोस्टमध्ये लिहिलं होतं.
दीप्तीनं पोस्टमध्ये लिहिलं आहे की, आम्ही दोघांनीही आनंदानं घालवलेले प्रेम आणि आपुलकीचे चांगले क्षण नेहमी लक्षात राहतील. मात्र दोघांनी सोशल मीडियावरून एकमेकांना अनफॉलो केलं आहे.
दुसरीकडे षणमुख सोशल मीडियावर लाइव्ह चॅटमध्ये म्हणाला होता की, कृपया ब्रेकअप म्हणत मला घाबरवू नका. होय, दीप्ती सध्या माझ्यावर रागावलेली आहे पण मी तिला लवकरच भेटेन.
यूट्यूब स्टार सिरी हनुमंतला त्यांच्या ब्रेकअपचं कारण मानलं जात आहे. दीप्ती बिग बॉस तेलुगुच्या पाचव्या सीझनमध्ये षण्मुखला सिरी हनुमंतच्या जवळ दिसले होते, अगदी दोघेही एकमेकांना घट्ट मिठी मारताना दिसले होते.
दीप्ती आणि षण्मुख तेलगू बिग बॉसमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाले आहेत. दीप्ती किरक पार्टी या चित्रपटात दिसली आहे.