दीपिकाचे वडील माजी बॅडमिंटन चॅम्पियन प्रकाश पदुकोण रुग्णालयात; लस घेतल्यानंतर कोरोनाची लागण

दीपिकाचे वडील माजी बॅडमिंटन चॅम्पियन प्रकाश पदुकोण रुग्णालयात; लस घेतल्यानंतर कोरोनाची लागण

अभिनेत्री दीपिका पदुकोण हिचे वडील आणि माजी बॅडमिंटन चॅम्पियन असलेले वडील प्रकाश पदुकोण यांना कोरोनाची लागण झाली आहे. तिची आई आणि बहिणीचे रिपोर्टही कोरोन पॉझिटिव्ह आले आहेत.

  • Share this:

बंगळुरू, 4 मे : बॉलिवूडला आणि क्रीडा विश्वालाही कोरोनाने घेरायला सुरुवात केली आहे. अनेक कलाकार, खेळाडू कोरोनाग्रस्त होत आहेत. अनेकांनी या विषाणूवर यशस्वी मातही केली आहे. कोरोनाच्या संकटामुळे IPL 2021 सुद्धा मध्येच रद्द करावी लागली. या यादीत आता आघाडीची अभिनेत्री दीपिका पदुकोण हिचे वडील आणि माजी बॅडमिंटन चॅम्पियन असलेले वडील प्रकाश पदुकोण (Deepika padukone father prakash padukone coronavirus)यांची भर पडली आहे. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार, प्रकाश पदुकोण यांना बंगळुरूच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दीपिकाची आई आणि बहीणही कोरोनाग्रस्त आहेत. पण त्यांच्यावर घरीच उपचार सुरू आहेत.

बंगळुरूच्या महावीर जैन रुग्णालयात प्रकाश पदुकोण यांना दाखल करण्यात आलं असल्याचं वृत्त ABP ने दिलं आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांची प्रकृती सुधारत असल्याचंही या बातमीत म्हटलं आहे. प्रकाश पदुकोण यांनी त्यांच्या बॅटमिंटन कारकीर्दीत प्रतिष्ठेच्या ऑल इंग्लंड चॅम्पियनशिपमध्ये विजेतेपद मिळवलं होतं. जागतिक क्रमवारीत ते अग्रस्थानीही होते.

IPL BREAKING: IPL 2021 रद्द, BCCI उपाध्यक्ष राजीव शुक्लांची माहिती

66 वर्षांचे प्रकाश पदुकोण यांनी 1980 च्या दशकात भारताचं नाव बॅडमिंटन क्षेत्रात नावारुपाला आणलं होतं. कॉमनवेल्थ गेम्समध्येही त्यांनी भारतासाठी पदक जिंकलं होतं.

चेन्नई-कोलकात्यापाठोपाठ SRH आणि दिल्लीच्या 2 खेळाडूंना कोरोनाची लागण

प्रकाश पदुकोण यांची पत्नी उज्ज्वला आणि दुसरी मुलगी अनीषा या दोघींनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्या घरी उपचार  घेत आहेत. प्रकाश पदुकोण यांनी कोरोनाची लस घेतली होती. त्यांचा दुसरा डोस बाकी होता. त्यापूर्वीच त्यांना या विषाणूची लागण झाली.

First published: May 4, 2021, 4:37 PM IST

ताज्या बातम्या