मुंबई, 22 जानेवारी: बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री दीपिका पादुकोणने अनेक हिट चित्रपट दिले आहेत. दीपिका पादुकोणचा (
deepika padukon Gehraiyaan) 'गहराइयाँ' हा नवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 'गहराइयाँ' चित्रपटात सिद्धांत चतुर्वेदीसोबत (
Siddhant Chaturvedi) दीपिका रोमान्स करताना दिसून येत आहे. तिने या चित्रपटांमध्ये इंटिमेट सीन दिले आहेत. हे सीन सध्या विशेष चर्चेत आहेत. आता एका मुलाखतीमध्ये दीपिकाने किसिंग आणि इंटिमेट सीनवर वक्तव्य केलं आहे. तिच्या खुलाशाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तिने या सीनबाबत दिग्दर्शकाला श्रेय दिलं आहे. ती म्हणाली आहे की, असे सीन करणं सोपं जातं जेव्हा तुम्हाला दिग्दर्शकाचा हेतू माहित असतो.
चित्रपटातील इंटिमेट सीनवर बोलताना दीपिकाने दिग्दर्शक शकुन बत्राचं कौतुक केलं आहे. 'यापूर्वी मी कधी ऑन-स्क्रीन इंटिमेट सीन दिले नाहीत; पण, दिग्दर्शकाचा हेतू माहिती असल्यानंतर इंटिमेट सीन देणं सोपं जातं. इंटिमेट सीन हे फक्त डोळ्यांना सुख देण्यासाठी करण्यात येत नसून तेथून पात्र उलगडत असतं. तसंच इंटिमेट सीन शूट करताना मला आणि आम्हा सर्वांना शकुनने कंफर्ट दिला. कारण, इंटिमेट सीन शूट करणं सोपं नाही. इंटिमेट सीन हे भारतीय चित्रपटसृष्टीत यापूर्वीही शूट करण्यात आले आहेत.' असं दीपिकाने सांगितलं.
हे वाचा-Malaika ने 25व्या वर्षी Arbaaz Khanशी लग्न करण्याविषयी पहिल्यांदाच सोडलं मौन
'गहराइयाँ' चित्रपटात इंटिमेट सीन शूट करण्यासाठी दिग्दर्शक शकुन बत्राने विशेष दिग्दर्शन घेतला होता. यामुळे कलाकारांना हे सीन देणं सोपं झाल्याची माहिती आहे. बहुचर्चित ‘गहराइयाँ’चा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. सध्या या टीझरची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होताना दिसत आहे. या चित्रपटात अभिनेत्री दीपिका पदुकोण, सिद्धांत चतुर्वेदी आणि अनन्या पांडे (
Ananya Panday) यांच्या मुख्य भूमिका आहेत. याशिवाय, या चित्रपटात अभिनेता नसिरुद्दीन शाह आणि रजत कपूर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका पाहायला मिळणार आहेत.
या चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमिअर 11 फेब्रुवारी 2022 रोजी Amazon Prime Video या ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार आहे. वायकॉम 18, धर्मा प्रॉडक्शन्स आणि शकुन बत्रा यांच्या जॉस्का फिल्म्सने या चित्रपटाची संयुक्त निर्मिती केली आहे. हा चित्रपट विवाह, घटस्फोट आणि विस्कटलेल्या नातेसंबंधांवर केंद्रित आहे. हा चित्रपट नात्यातली गुंतागुंत उलगडत जाणारा आहे. या चित्रपटाचं शूटिंग गोव्यात कोरोना महामारीच्या काळात झालं होतं. आता हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.