मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /दीपिकाच्या वडिलांनी नात्यातील बहिणीशीच केलंय लग्न; प्रकाश पादुकोण यांच्या खुलाशाने खळबळ

दीपिकाच्या वडिलांनी नात्यातील बहिणीशीच केलंय लग्न; प्रकाश पादुकोण यांच्या खुलाशाने खळबळ

दीपिकाच्या वडिलांनी नात्यातल्या चुलत बहिणीसोबत केलंय लग्न.

दीपिकाच्या वडिलांनी नात्यातल्या चुलत बहिणीसोबत केलंय लग्न.

Deepika Padukone Father Prakash Padukone Interview: दीपिका पादुकोणचे वडील आणि बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आपल्या एका मुलाखतीमुळे चर्चेत आले आहेत. या मुलाखतीत त्यांनी केलेल्या एका खुलाशाने चांगलीच खळबळ माजली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Maharashtra, India

मुंबई, 25 मार्च- बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि पती-अभिनेता रणवीर सिंग नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. या दोघांची जोडी प्रेक्षकांना प्रचंड पसंत पडते. परंतु एका पुरस्कार सोहळ्यात दोघांच्या वागण्यावरुन या दोघांमध्ये काहीतरी बिनसल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. या चर्चा सुरु असतानाच आता दीपिका पादुकोणचे वडील आणि बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आपल्या एका मुलाखतीमुळे चर्चेत आले आहेत. या मुलाखतीत त्यांनी केलेल्या एका खुलाशाने चांगलीच खळबळ माजली आहे.

बॅडमिंटन क्षेत्रात मोठं नाव असणाऱ्या प्रकाश पादुकोण यांची एक मुलाखत सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या बॅडमिंटन कारकिर्दीबद्दल, यशाबद्दल, अपयशांबद्दल मनमोकळेपणाने संवाद साधला आहे. यादरम्यान त्यांनी पत्नी उज्जला पादुकोणबाबत एक खळबळजनक खुलासा केला आहे. ज्यामुळे सध्या ते नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आले आहेत. यामध्ये काही लोक त्यांना पाठिंबा देत आहेत, तर काही लोक आक्षेप घेत आहेत. पाहूया नेमकं काय घडलंय.

(हे वाचा:Lataa Saberwal: शाहिद कपूरच्या ऑनस्क्रीन वहिनीला गंभीर आजार;आवाजही गमावण्याची शक्यता )

दीपिकाचे वडील प्रकाश पादुकोण यांनी या मुलाखतीत आपल्या खाजगी आयुष्यावर भाष्य करत सांगितलं की, दीपिकाची आई त्यांची नात्यातील बहीण आहे. अर्थातच त्यांनी आपल्या नात्यातील बहिणीसोबत लग्न करत संसार थाटला आहे. त्यांच्या या खुलाशाने एकच खळबळ माजली आहे. सोशल मीडियावर लोक संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत.

Tटाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत दीपिकाचे वडील आणि बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण म्हणाले की, 'मला आठवतं की, मी नॅशनल चॅम्पियनशिप खेळलो होतो. ज्यामध्ये माझा पराभव झाला होता. जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर असूनही मी नऊ वर्षांनंतर प्रथमच राष्ट्रीय स्पर्धेत हरलो होतो. त्यावेळी त्या गोष्टीचं मला प्रचंड वाईट वाटलं होतं. तेव्हा मला प्रकर्षाने जाणवलं की, खेळात कधी कधी तुम्ही पराभूतही होऊ शकता आणि जिंकूही शकता. कारण हा एक खेळ आहे. आपण विजयानंतर फार उत्साही होऊ शकत नाही आणि पराभवानंतर दु:खीही होऊ शकत नाही.या पराभवानंतर आपण आपल्या नात्यातील बहीण म्हणजेच कजिनसोबत लग्न केल्याचं त्यांनी सांगितलं आहे. या गोष्टीमुळे लोक त्यांना ट्रोल करत आहेत.

दीपिका पादुकोणचे आई वडील नात्यातील भाऊबहीण असल्याचं समजताच सोशल मीडियावर नव्या वादाला तोंड फुटलं आहे. नेटकऱ्यांनी त्यांच्यावर टीका करत नात्यावर आक्षेप घेतला आहे. तर काही नेटकऱ्यांनी प्रकाश पादुकोण यांना पाठिंबा देत, दक्षिण भारतात ही एक सर्वसामान्य पद्धत असल्याचं म्हटलं आहे. या प्रकरणाला आता कोणतं नवं वळण लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

First published:
top videos

    Tags: Bollywood, Deepika padukone, Entertainment