• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • करीना-दीपिकाला नव्हती मिळाली सीतेच्या रोलची ऑफर; ..म्हणून थलायवी कंगानाची लागली वर्णी

करीना-दीपिकाला नव्हती मिळाली सीतेच्या रोलची ऑफर; ..म्हणून थलायवी कंगानाची लागली वर्णी

‘द इनकारनेशन : सीता’ (The Incarnation : Sita) हा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

 • Share this:
  मुंबई 17 सप्टेंबर : सिनेसृष्टीत रामायणावर (Ramayana) आधारीत अनेक चित्रपट आणि मालिका आजवर येऊन गेल्या. तर अनेक अभिनेत्रींनी त्यात सीतेची भूमिका साकारली आहे. तर या महत्त्वकांक्षी रोलनंतर अनेक अभिनेत्रींना मोठी ओळख मिळाली होती. तर आता ‘द इनकारनेशन : सीता’ (The Incarnation : Sita) हा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाच्या कास्टींगसाठी मोठा विवादही निर्माण झाला होता. या चित्रपटासाठी अनेक अभिनेत्रींची नावं समोर येत होती. पण आता या चित्रपटात अभिनेत्री कंगना राणौत (Kangana Ranaut) काम करणार असल्याचं समोर येत आहे. नुकतंच कंगनानेही तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर याची घोषणा केली. दरम्यान काही दिवसांपूर्वी या रोलसाठी अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor) आणि दीपिका पादूकोन (Deepika Padukone) यांच्या नावांची जोरदार चर्चा होती. मात्र आता कंगनाची वर्णी या रोलसाठी लागली आहे. चित्रपटाचे लेखक मनोज मुंटाशीर (Manoj Muntashir) यांनी सांगितलं की या भूमिकेसाठी दीपिका किंवा करीनाला विचारण्यात आलं नव्हतं.
  करीनाला या रोलसाठी विचारण्यात आलं होतं अशी बातमी समोर आली होती. तसेच तिने या रोलसाठी 12 कोटी रुपयांची मागणी केली होती. अशीही माहिती समोर आली होती. त्यानंतर करीनाला ट्रोल करण्यात आलं होतं. तसेच दीपिकाला देखील चित्रपटासाठी विचारण्यात आलं होतं अशी अफवा होती, मात्र मनोज यांनी या सगळ्या अफवा असल्याचं म्हटलं आहे. फ्री प्रेस जर्नलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली तसेच या रोलसाठी कोणी यंग अभिनेत्रीचा शोध घेत होतो असंही त्यांनी सांगितलं. नुकताच कंगनाचा थलायवी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. थिएटर्समध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट काही ठिकाणी चांगला प्रसिसाद मिळवत आहे. तर संमिश्र प्रतिक्रियाही प्रेक्षकांकडून येत आहे.
  Published by:News Digital
  First published: