मुंबई, 15 जुलै : अभिनेत्री अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर यांच्या अफेअरची बॉलीवूडमध्ये जोरदार चर्चा आहे. गेल्या वर्षी कृती सेननच्या दिवाळी पार्टीत अनन्या आणि आदित्य एकत्र दिसले होते. त्यानंतर देखील दोघं अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसायचे. तेव्हापासून दोघांच्या डेटिंगच्या चर्चा रंगल्या होत्या. आता पुन्हा एकदा कपलचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत, ज्यामध्ये त्यांनी स्पेनमधील एकाच कार्यक्रमाचे फोटो शेअर केले होते. त्यावरून दोघंही एकत्र फिरायला गेल्याचं स्पष्ट झालं. आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडे हे एकमेकांना डेट करत आहेत. यादरम्यान आता आदित्य रॉय कपूरने नात्यातील काइंडनेसबद्दल भाष्य केलं आहे. आदित्यने अलीकडेच एका कार्यक्रमादरम्यान सांगितलं की, डेटिंग लाइफमध्ये काइंडनेस (दयाळूपणा) ही एक खास गोष्ट असते.
आदित्य एका कार्यक्रमादरम्यान म्हणाला, “मला वाटतं की लोकांशी चांगलं वागणं आणि तुमच्यासोबत रोमँटिक रिलेशनशिप असलेल्या चांगल्या लोकांसोबत चांगलं वागणं ही मोठी गोष्ट आहे.” आदित्य रॉय कपूर नात्यांमधील काइंडनेसबद्दल म्हणतो, “मला वाटत नाही की दयाळूपणा स्टाइलच्या बाहेर जायला पाहिजे. कारण ही लोकांमध्ये अशी गोष्ट आहे जी समाजाला जगण्यास मदत करते, लोकांना इतरांसोबत जगण्यासाठी हिंमत देते. रोमँटिक नात्यात, मैत्रीत किंवा कोणत्याही नात्यातील मुख्य गोष्ट म्हणजे तुम्ही सर्वांशी दयाळूपणे वागलं पाहिजे, विशेषत: रोमँटिक रिलेशनशिपमध्ये,” असं तो म्हणाला होता. आदित्य आणि अनन्या पांडे यांच्यातील नात्याचा खुलासा सर्वप्रथम करण जोहरने त्याच्या कॉफी विथ करण या टॉक शोमध्ये केला होता. डिसेंबर 2022 मध्येही दोघे एकत्र दिसले होते. त्यानंतर दोघेही एकत्र ‘फिफा वर्ल्ड कप 2022’ पाहण्यासाठी कतारला पोहोचले होते. अनेकदा हे कपल एकत्र दिसतं, पण त्यांनी नात्याबद्दल बोलणं टाळलंय. गश्मिरच्या सोशल मीडियावर कुटुंबासोबतचे अनेक फोटो; मात्र वडिलांचा एकही फोटो नाही? आदित्यच्या फिल्म्सच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास तो शेवटचा वेब सीरिज ‘द नाईट मॅनेजर 2’ मध्ये दिसला होता. आदित्यसोबत या शोमध्ये अनिल कपूर, शोभिता धुलिपाला, तिलोत्तमा शोम असे अनेक स्टार्स होते. आदित्य सध्या सारा अली खानसोबत ‘मेट्रो इन डिनो’चं शूटिंग करत आहे. या चित्रपटात अनुपम खेर, नीना गुप्ता, पंकज त्रिपाठी, कोंकणा सेन, अली फजल आणि फातिमा सना शेख दिसणार आहेत. अनन्याच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ती आयुष्मान खुरानासोबत ‘ड्रीम गर्ल 2’ मध्ये काम करत आहे. हा चित्रपट 25 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.