मुंबई, 08 फेब्रुवारी : माणूस संघर्षातूनच घडतो असं म्हणतात.या मंत्राला अनुसरून प्रयागराज येथील इरफान राजने 10 लाखांहून अधिक चाहत्यांच्या हृदयात स्थान मिळवले आहे. सोशल मीडियावर त्याचे 10 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. लहानपणापासून कलेची आवड असलेल्या इरफानचे वडिलोपार्जित घर मिर्झापूरच्या अहरौरा येथे आहे. सुमारे दहा वर्षांपूर्वी इरफानची आई आणि त्याच मोठा भाऊ बनारसमध्ये त्याच्या आजोळी आला आणि भाड्याच्या घरात राहू लागला. दरम्यान, इरफानने जेव्हा-जेव्हा त्याचे नृत्यकौशल्य दाखवलं, तेव्हा त्याच्यावर धार्मिक कारण देत बंधनं घालण्यात आली. मात्र त्याचा मोठा भाऊ शेरा अहमद आणि आईने इरफानची कला कधीच नाकारली नाही तर त्याला पाठिंबा दिला. आज इरफानचे युट्यूब, इन्स्टाग्रामसारख्या प्लॅटफॉर्मवर लाखो चाहते आहेत.
अनेक चित्रपटांमध्ये केले आहे काम
इरफानच्या नृत्यकलेला मोठ्या व्यासपीठावर मान्यता मिळाली आहे.त्याला ब्रह्मास्त्र, शुभ मंगल ज्यादा सावधान यांसारख्या बॉलीवूड चित्रपटांमध्ये नृत्य आणि अभिनय करण्याची संधी मिळाली. या शिवाय इरफानने असुर, एम फॉर माफिया, कंट्री माफिया यांसारख्या वेब सीरिज मध्येही काम केलं आहे. त्याला राष्ट्रीय स्तरावरील फॅशन आणि मॉडेलिंग शोमध्ये सेलेब्रिटी जज म्हणून आमंत्रित करण्यात आलं होतं. बनारस हिंदू विद्यापीठात आयोजित आयआयटी संस्थेच्या काशी यात्रा डान्स शोमध्ये तो प्रथम विजेता ठरला आहे. इरफान हे एक रहस्य आहे. माझ्या आयुष्यात अनेक रहस्य दडलेली आहेत. मुस्लीम असल्याने मला त्रासाला सामोरं जावं लागलं, असं इरफानने 'न्यूज 18 लोकल'शी बोलताना सांगितलं.
हेही वाचा - शेतकऱ्याचा नादखुळा! वीज तोडायला आलेल्या महावितरण अधिकाऱ्याला इंग्रजीतून विचारला जाब, Video Viral
फतव्याच्या प्रकरणातून घाबरवण्याचा झाला प्रयत्न
इरफान राजने सांगितले की, 'माझ्या धर्मबंधूंनी माझ्या मार्गात अनेक वेळा अडथळा आणण्याचा प्रयत्न केला, परंतु, प्रत्येक वेळी मी माझ्या ध्येयाला प्राधान्य दिले. जेव्हा मी मशिदीत नमाज अदा करायला जायचो तेव्हा मौलवी साहेब चूक आणि बरोबर गोष्टींविषयी माझ्याशी बोलत आणि फतवा समजावून सांगत. हा प्रकार इतका वाढला होता की मी मशिदीत जाणं कमी केलं आणि घरामध्ये नमाज अदा करू लागलो. इतकंच नाही तर परिसरातील लोकही माझ्या दिसण्यावर टोमणे मारायचे आणि माझ्या वर्तणूकीवर अनेक प्रश्न उपस्थित करायचे. पण मी हिंमत न हारता माझ्या मार्गावर चालत राहिलो'.
युट्यूबकडून मिळालं सिल्व्हर बटण
डान्सविषयी बोलायचे झाले तर लुधियाना येथे आयोजित कार्यशाळेत त्याने एक महिन्याचे प्रशिक्षण घेतले. तसेच त्याला शिष्यवृ्त्ती प्रदान करण्यात आली. याशिवाय जयपूर, दिल्ली, कोलकात्यासह बनारस मधील अनेक ठिकाणी कार्यशाळांमध्ये तसेच दिल्ली, पाटणा आदी ठिकाणी डान्सचे प्रशिक्षण घेतले. इरफान राज आता शिकण्यासोबत नृत्य शिकवण्याचे काम करत आहे. त्याला नुकतेच युट्युब कंपनीकडून सिल्व्हर बटण मिळाले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Local18