जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Review : विकेंडला सिनेमाचा प्लान करताय, त्याआधी वाचा कसा आहे सलमानचा Dabangg 3

Review : विकेंडला सिनेमाचा प्लान करताय, त्याआधी वाचा कसा आहे सलमानचा Dabangg 3

Review : विकेंडला सिनेमाचा प्लान करताय, त्याआधी वाचा कसा आहे सलमानचा Dabangg 3

सलमान खानचा दबंग 3 हा सिनेमा नुकताच रिलीज झाला. त्याच्या चाहत्यांना या सिनेमाकडून बऱ्याच अपेक्षा आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 20 डिसेंबर : बॉलिवूडचा दबंग म्हणून ओळखला जाणारा सलमान खानचा दबंग 3 हा सिनेमा नुकताच रिलीज झाला. सलमान खान आणि त्यासोबतच त्याच्या चाहत्यांनाही या सिनेमाकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. सलमाननं या सिनेमाचं अगदी जोरदार प्रमोशन केलं. त्यामुळे या सिनेमाच्या तिकीटांचं प्रीबुकींग सुद्धा झालं. सिनेमा रिलीज होऊन अवघे काही तास उलटले असून सोशल मीडियावर प्रेक्षकांचे रिव्ह्यू यायला सुरुवात झाली आहे. ‘दबंग 3’ सिनेमा रिलीज झाल्यानंतर सोशल मीडियावर आलेल्या प्रतिक्रिया पाहता काही लोकांना हा सिनेमा खूप आवडला असला तरीही काही प्रेक्षकांच्या अपेक्षा मात्र हा सिनेमा पूर्ण करु शकलेला नाही. अनेकांनी ट्विटरवर आपली नाराजी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे यात सलमानचे चाहते सुद्धा आहेत. एका चाहत्यानं लिहिलं, मला सिनेमाचं तिकीट मोफत मिळालं होतं. सिनेमा पाहून बाहेर पडलो तर मला वाटलं की, मी हे मोफतच तिकीट तरी का घेतलं? पण मी सलमानचा चाहता आहे. सलमान भाई कधी पर्यंत चालणार हे. एक तर चांगली सिनेमा तयार कर नाही तर रिटायर्डमेंट घे. रंगोली चंडेलच्या निशाण्यावर महेश भट, मुलीसोबत लिपलॉक KISS चा फोटो केला पोस्ट दुसऱ्या एका युजरनं लिहिलं, असं वाटतं की दबंग 3 खूप घाईघाईत तयार करण्यात आला आहे. यावरुनचं दिसतं की, ‘राधे’चं शूट सुद्धा यापेक्षा घाईत केलं जाईल. ईदच्या दिवशी येणार ना? घाबरणार तर नाही ना? तर आणखी एका व्यक्तीनं लिहिलं, दबंग 3चा रिव्ह्यू एक ओळीत वाईट आणि फ्लॉप. या सिनेमाला 5 पैकी 1 स्टार मिळेल, जो की फक्त सिनेमाचं म्युझिक आणि गाणी यासाठी मिळेल. …म्हणून ‘छपाक’च्या सेटवर पहिल्याच दिवशी दीपिकाला कोसळलं होतं रडू

‘दबंग 3’बद्दल एका युजरनं लिहिलं, सिनेमाचं फर्स्ट हाफ म्हणजे टॉर्चर आहे. सोनाक्षी आणि सलमानच्या टॉर्चरमुळे माझे काही मित्र थिएटर सोडून गेले. इतकंच नाही तर माझ्या पत्नीलाही हा सिनेमा फारसा आवडला नाही. एकंदर काय तर हा सिनेमा प्रेक्षकांना फारसा आवडलेला दिसला नाही. पण काहींनी मात्र सलमानच्या या सिनेमाचं खूप कौतुक केलं आहे. सोनाक्षी सिन्हा, सई मांजरेकर, सलमान खान आणि किच्चा सुदीप यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर किती कमाई करतो हे येत्या काळातच समजेल. अनिल कपूरच्या हॅन्डसम आणि आनंदी दिसण्याचं ‘हे’ आहे गुपित!

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात