मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'आशियातील दुसऱ्या सगळ्यात मोठ्या होर्डिंगवर झळकलं 'Daagdi Chaawl 2' चं पोस्टर', VIDEO तुफान VIRAL

'आशियातील दुसऱ्या सगळ्यात मोठ्या होर्डिंगवर झळकलं 'Daagdi Chaawl 2' चं पोस्टर', VIDEO तुफान VIRAL

मराठी चित्रपटांची सध्या चांगलीच हवा दिसून येत आहे.आता 'दगडी चाळ 2' ची अशीच चर्चा होताना दिसत आहे.

मराठी चित्रपटांची सध्या चांगलीच हवा दिसून येत आहे.आता 'दगडी चाळ 2' ची अशीच चर्चा होताना दिसत आहे.

मराठी चित्रपटांची सध्या चांगलीच हवा दिसून येत आहे.आता 'दगडी चाळ 2' ची अशीच चर्चा होताना दिसत आहे.

  मुंबई, 12 ऑगस्ट-   मराठी चित्रपटांची सध्या चांगलीच हवा दिसून येत आहे. नुकतंच 'चंद्रमुखी' या मराठी चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान चित्रपटाचं पोस्टर चक्क विमानावर झळकलं होतं. या ट्रिकची प्रचंड चर्चा झाली होती. त्यांनतर आता 'दगडी चाळ 2' ची अशीच चर्चा होताना दिसत आहे. कारण आशियातील दुसऱ्या सर्वात मोठ्या होर्डिंगवर या चित्रपटाचं पोस्टर दिमाखात झळकलं आहे. अभिनेत्री पूजा सावंतने व्हिडीओ शेअर करत याबाबतची माहिती चाहत्यांना दिली आहे. 'दगडी चाळ' हा चित्रपट 2015  मध्ये रिलीज झाला होता. हा चित्रपट तुफान लोकप्रिय ठरला होता. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित असल्याने प्रेक्षकांमध्ये याबाबत मोठी उत्सुकता पाहायला मिळाली होती. त्यांनतर आता तब्बल 8 वर्षांनी या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. नुकतंच या चित्रपटाचं दमदार असं ट्रेलर रिलीज झालं आहे. प्रेक्षकांना चित्रपटाची मोठी प्रतीक्षा आहे. तत्पूर्वी या चित्रपटाचं जबरदस्त प्रमोशन केलं जात आहे. सध्या हा चित्रपट आपल्या अवाढव्य पोस्टरमुळे चर्चेचा विषय बनला आहे. अभिनेत्री पूजा सावंतने नुकतंच आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये चित्रपटाचं भलंमोठं पोस्टर पाहायला मिळत आहे. अभिनेत्रीने कॅप्शन देत लिहलंय, 'आशिया खंडातील दुसऱ्या सगळ्यात मोठ्या होर्डिंगवर दिमाखात झळकलं दगडी चाळ 2 चं पोस्ट'. हे पोस्टर पाहून चाहते भरभरुन लाईक्स आणि कमेंट्स करत आहेत. येत्या 19 ऑगस्टला हा चित्रपट रिलीज होणार आहे.
  (हे वाचा:Prajakta Mali: भाच्यांसोबत प्राजक्ताची फुल टू धम्माल; अभिनेत्रीने शेअर केले भन्नाट फॅमिली PHOTO ) 'दगडी चाळ 2' या चित्रपटात अभिनेते मकरंद देशपांडे यांनी 'डॅडी' अर्थातच अरुण गवळींची भूमिका साकारली आहे. तसेच चित्रपटात अंकुश चौधरी, पूजा सावंत यांच्या मुख्य भूमिका आहेत. कलाकार सध्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Entertainment, Instagram post, Marathi cinema, Marathi entertainment

  पुढील बातम्या