मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळीने नुकतंच आपला वाढदिवस साजरा केला. अभिनेत्रीने यावेळी आपल्या फॅमिलीसोबत धम्माल केली आहे.
इतकंच नव्हे तर अभिनेत्रीने काल एक व्हिडीओ शेअर केला होता. यामध्ये ती आपल्या भावंडांसोबत लगोरीचा डाव खेळताना दिसली होती.
प्राजक्ताने प्री-बर्थडे सेलिब्रेशन म्हणत आपल्या फॅमिलीसोबतचे सुंदर फोटो शेअर केले आहेत. फोटोंवरुन अभिनेत्री एखाद्या रिसॉर्टमध्ये व्हेकेशन एन्जॉय करत असल्याचं लक्षात येत आहे.