मुंबई, 3 जानेवारी- छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध शो 'क्राईम पेट्रोल' सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. याचं कारण आहे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणारं आणि सर्वांनाच हादरवून सोडणारं श्रद्धा वालकर प्रकरण. नुकतंच सोनी टीव्हीच्या 'क्राईम पेट्रोल' या शोमध्ये एक एपिसोड प्रसारित करण्यात आला होता. यामध्ये एका मुलाने आपल्या गर्लफ्रेंडचे तुकडे केल्याचं दाखविण्यात आलं होतं. त्यामुळे प्रेक्षकांनी हा एपिसोड श्रद्धा वालकर प्रकरणाशी बराचसा मिळता-जुळता असल्याचं सांगत त्यावर आक्षेप घेतला होता. त्यामुळे आता नवा वाद निर्माण झाला आहे.
काही दिवसांपूर्वी उघडकीस आलेला श्रद्धा वालकर आणि आफताब पुनावाला या प्रकरणाचा तपास सध्या दिल्ली पोलीस करत आहेत. या प्रकरणाने देशाला हादरवून सोडलं होतं. अंगावर शहारा आणणारं हे प्रकरण अजून ताजचं आहे. अशातच छोट्या पडद्यावरील लोकप्रिय असणाऱ्या 'क्राईम पेट्रोल' या शोमध्ये एक एपिसोड प्रसारित करण्यात आला आहे. यामध्ये दाखविण्यात आलेली कथा श्रद्धा वालकर प्रकरणाशी मिळतीजुळती असल्याचं प्रेक्षकांचं म्हणणं आहे. त्यामुळे हा एपिसोड सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.
(हे वाचा:तुनिषा प्रकरणाला नवं वळण; बॉयफ्रेंड शिझानच्या कुटुंबियांनी दोघांच्या ब्रेकअपबाबत केला मोठा खुलासा )
हा एपिसोड प्रसारित होताच पाहणारे प्रेक्षक दचकल्याचं सांगण्यात येत आहे. हे प्रकरण समोर येताच प्रेक्षकांनी संताप व्यक्त केला आहे. शिवाय एपिसोड पाहिलेल्या प्रेक्षकांनी आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून यावर नाराजी व्यक्त करत आक्षेप घेतला आहे. त्यामुळे या एपिसोडची चांगलीच चर्चा होत आहे.आज तकच्या रिपोर्ट्सनुसार, हे सर्व प्रकरण पाहून आता सोनी वाहिनीने या एपिसोड संबंधित माफीनामा जाहीर केल्याचं समोर आलं आहे. याबाबत त्यांनी माफी मागितल्याचं म्हटलं जात आहे.
— Sony LIV (@SonyLIV) January 2, 2023
हा एपिसोड पाहणाऱ्या प्रेक्षकांचं म्हणणं आहे की, 'क्राईम पेट्रोल'च्या या एपिसोडमध्ये श्रद्धा वालकर प्रकरणाला बऱ्याच अंशी मोडतोड करून दाखविण्यात आलं आहे. त्यामुळे ते प्रेक्षकांना अजिबात पटलेलं नाहीय. त्यावर त्यांनी खेद व्यक्त केला आहे. त्यामुळे अनेक प्रेक्षकांनी सोशल मीडियावर वाहिनी आणि या शोच्या विरोधात बॉयकॉट ट्रेंड सुरु केला होता. प्रेक्षकांनी आक्षेप घेताच वाहिनीने आपल्या सर्व प्लॅटफॉर्म्समधून हा एपिसोड काढून टाकत माफीनामा जाहीर केला आहे.
सोनी वाहिनीकडून आलेल्या जाहीरनाम्यात असं सांगण्यात आलं आहे की, प्रेक्षकांचं म्हणणं आहे की, हा एपिसोड नुकतंच प्रसारित झालेल्या एका प्रकरणाशी मिळताजुळता आहे. परंतु आम्ही सांगू इच्छितो की, हा एपिसोड काल्पनिक आहे. हा एपिसोड वास्तविक 2011 मध्ये झालेल्या एका हत्याकांडावर आधारित आहे. त्यामुळे आत्ताच्या प्रकरणाशी याचं काहीही घेणंदेणं नाहीय. परंतु या एपिसोडमुळे प्रेक्षकांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर त्यासाठी आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. तसेच आमच्याकडून हा एपिसोड हटविण्यात आला आहे'. असं म्हणत वाहिनीने माफीनामा जाहीर केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime, Entertainment, Sony tv