मुंबई, 15 जानेवारी- देशासह राज्यात कोरोनाचा (covid-19) कहर पाहायला मिळत आहेत. मुंबईत देखील दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. याचा फटका मनोरंजन विश्वाला देखील बसला आहे. तिसऱ्या लाटेत अनेक कलाकारांना कोरोना झाल्याची माहिती समोर आली आहे. स्टार प्रवाह वाहिनीवर पिंकीचा विजय असो (Pinkicha Vijay Aso) या मालिका सुरू होणार होत. मात्र कोरोनाचा वाढता प्रसार पाहता आता पिंकीचा विजय असो ही मालिका 31 जानेवरीला लग्नाची बेडी (Lagnachi Bedi) या मालिकेसोबत सुरू होण्याची शक्यता आहे. स्टार प्रवाहवर नवी मालिका ‘पिंकीचा विजय असो'17 जानेवारीपासून रात्री 11 वाजता सुरू होणार होती. नवोदित अभिनेत्री शरयू सोनावणे (Sharayu Sonawane) पिंकी ही भूमिका साकारताना दिसतेय. मात्र आता ही मालिका 31 जानेवारीला सुरू होण्याची शक्यता एका पोर्टलने व्यक्त केली आहे. पिंकीचा विजय असो या मालिकेमुळे तुझ्या इश्काचा नादखुळा या रात्री 11 वाजता दिसणाऱ्या मालिकेची वेळी बदलणार होती. मात्र कोरोनामुळे पिंकीची विजय असो ही मालिका पुढे ढकलण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे तुझ्या इश्काचा नादखुळा ही मालिका नेहमीच्या वेळेत रात्री 11 वाजता दिसणार आहे. आयुष्य भरभरून जगणाऱ्या अतरंगी आणि सतरंगी पिंकीची गोष्ट या मालिकेतून उलगडेल. खाईन तर तुपाशी अश्या ठाम विचारांच्या असणाऱ्या पिंकीला फिल्मी दुनियेचं फार आकर्षण आहे. तिच्या रहाण्यातून, वागण्यातून आणि बोलण्यातून ते प्रकर्षाने जाणवतं. दुसऱ्याकडून काम करुन घेण्याचं अजब कसब पिंकीकडे आहे. तिची इंग्रजी बोलण्याची एक वेगळीच स्टाईल आहे. अशी ही स्वप्नाळू पिंकी आपली स्वप्न कशी पूर्ण करते हे मालिकेतून पाहायला मिळेल.
स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवर 31 जानेवारीपासून स्टार प्लसवरील एका लोकप्रिय हिंदी मालिकेचा रिमेक पाहायला मिळणार आहे. या हिंदी मालिकेचे नाव गुम है किसी के प्यार मे असं आहे. याच्या मराठी रिमेकचे नाव लग्नाची बेडी (Lagnachi Bedi) असं आहे. मराठीतील मोठी स्टारकास्ट या मालिकेत दिसणार आहे. स्टार प्रवाह वाहिनीने या मालिकेचा प्रोमो आऊट केला आहे. हा प्रोमो शेअर करत म्हटले आहे की, शतजन्माचे अतूट नाते जीव दोघांचे जोडी,स्वर्गातच बांधली जाते ही ‘लग्नाची बेडी’…नवी मालिका, ‘लग्नाची बेडी’ प्रवाह दुपार सोमवार 31 जानेवारीपासून, सोम-शनि दु. 1:०० वा. Star प्रवाहवर… #Lagnachi Bedi #Star Pravah. वाचा- ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प’ फेम रोहित राऊत ‘या’ दिवशी अडकणार लग्नबंधनात हिंदी मालिकेत विराज सई आणि पाकी असा प्रेमाचा त्रिकोण पाहायला मिळतो. या मालिकेत देखील असंच काही दिसणार असल्याचे प्रोमो पाहिल्यानंतर लक्षात येते. यामध्ये विराजच्या भूमिकेत मराठी अभिनेता संकेत पाठक तर सईच्या भूमिकेत सायली देवधर दिसणार आहे. यासोबतच पा कीचे नकारात्मक भूमिका स्वामिनी फेम अभिनेत्री रेवती लेले साकारणार आहे. सई आणि विराजची जोडी ज्याप्रमाणे लोकप्रिय आहे त्याप्रमाणे मराठीतील ही नवीन जोडी देखील लोकप्रियता मिळवण्यात यशस्वी होणार का याची उत्सुकता लागली आहे.

)







