• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • ‘कार घ्यायला पैसे आहेत पण कर भरायला नाही?’ न्यायालयाने धनुषला फटकारलं

‘कार घ्यायला पैसे आहेत पण कर भरायला नाही?’ न्यायालयाने धनुषला फटकारलं

तुला कर भरावाच लागेल अशा शब्दात कोर्टाने त्याला धारेवर धरलं.

 • Share this:
  मुंबई 6 ऑगस्ट: दाक्षिणात्य सुपरस्टार धनुष (Dhanush) याला महागड्या वस्तुंची प्रचंड हौस आहे. महागड्या गाड्या, बाईक्स, घडाळं, दागिने, कपडे, इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस अशा अनेक वस्तुंचं कलेक्शन त्याच्याकडे आहे. (Dhanush expensive collection) याच कलेक्शनमध्ये काही दिवसांपूर्वी एका कारची भर पडली. मात्र या कोट्यवधींच्या कारमुळे न्यायालयाने त्याला फटकारलं आहे. तुला कर भरावाच लागेल अशा शब्दात कोर्टाने त्याला धारेवर धरलं. ‘अरुंधतीची वेदना मी अक्षरश: जगलेय’; तो सीन करताना मधुराणी यांना कोसळलं रडू पाहुया हे प्रकरण नेमकं आहे तरी काय? धनुषने रोल्स रॉय ही महागडी गाडी खरेदी करण्याकरिता लावण्यात आलेल्या करामध्ये कपात करण्याची विनंती करणारी याचिका न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेवर 2018 साली निर्णय देण्यात आला होता. परंतु, अजूनही गाडीवरील कर न भरल्याने न्यायमूर्ती सुब्रमण्यम यांनी धनुषच्या वकिलाला चांगलंच धारेवर धरलं. “अभिनेता आहे तर तो हेलिकॉप्टर देखील खरेदी करू शकतो. तेवढा हक्क त्याच्याकडे आहे. परंतु, जर हेलिकॉप्टर घ्यायचं तर त्यावरील करदेखील भरला गेला पाहिजे. तेच गाडीसाठी लागू होतं. कधीकाळी 50 रुपयांना पेट्रोल खरेदी करणारा सामान्य माणूस आज पेट्रोलच्या किंमती वाढल्याने कर भरतोय. मग तुम्हाला कर भरायला काय अडचण आहे?” असा रोखठोक सवाल न्यायमूर्तींनी केला. काही दिवसांपूर्वी असाच काहीसा अभिनेता विजयच्या बाबतीत घडला होता. त्याला देखील महागड्या गाडीच्या खरेदीवरील आयात कर चोरी केल्याप्रकरणी मद्रास उच्च न्यायालयाने सुनावलं होतं.
  Published by:Mandar Gurav
  First published: