मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /‘अरुंधतीची वेदना मी अक्षरश: जगलेय’; तो सीन करताना मधुराणी यांना कोसळलं रडू

‘अरुंधतीची वेदना मी अक्षरश: जगलेय’; तो सीन करताना मधुराणी यांना कोसळलं रडू

मालिकेत घर सोडताना ज्या वेदना झाल्या तशाच काहीशा वेदना अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर (Madhurani Gokhale Prabhulkar) यांनी खऱ्या आयुष्यात देखील अनुभवल्या आहेत.

मालिकेत घर सोडताना ज्या वेदना झाल्या तशाच काहीशा वेदना अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर (Madhurani Gokhale Prabhulkar) यांनी खऱ्या आयुष्यात देखील अनुभवल्या आहेत.

मालिकेत घर सोडताना ज्या वेदना झाल्या तशाच काहीशा वेदना अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर (Madhurani Gokhale Prabhulkar) यांनी खऱ्या आयुष्यात देखील अनुभवल्या आहेत.

मुंबई 6 ऑगस्ट: आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) ही मालिका छोट्या प़डद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणून सध्या चर्चेत आहे. या मालिकेत सध्या प्रचंड उलथापालथ पाहायला मिळत आहे. मालिकेच्या नव्या कथानकानुसार अनिरुद्ध आणि अरुंधतीचा 25 वर्षांचा संसार अखेरिस मोडला. घटस्फोटानंतर अरुंधतीने देशमुखांचं घर सोडलं. मालिकेत घर सोडताना ज्या वेदना झाल्या तशाच काहीशा वेदना अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर (Madhurani Gokhale Prabhulkar) यांनी खऱ्या आयुष्यात देखील अनुभवल्या आहेत.

मधुराणी यांनी मालिकेत साकारलेलं अरूंधती ही व्यक्तिरेखा सध्या प्रचंड चर्चेत आहे. त्यांचा अभिनय, हावभाव, व्यक्त होण्याची पद्धत याची प्रचंड स्तुती केली जात आहे. मात्र मालिकेत काम करत असताना मधुराणी यांना अनेकदा आपल्या आयुष्यातील खरे अनुभव आठवतात. खास करून घर सोडतानाचा अभिनय करत असताना त्यांच्या भावना खऱ्या अर्थानं अनावर झाल्या होत्या. हा अनुभव त्यांनी एका इन्स्टाग्राम पोस्टद्वारे आपल्या चाहत्यांना सांगितला आहे.

PHOTOS :'सहदेव दिरदो ते रानू मंडल' सोशल मीडियामुळे एका रात्रीत बनले स्टार

‘तू कुठल्या देशाची राणी?’ शेहनाजच्या BOLD फोटोंवर होतोय कौतुकाचा वर्षाव

काय म्हणाल्या मधुराणी?

“25 वर्ष जो संसार इतका जीव जडवून केला... तो डोळ्यासमोर उन्मळून पडताना पाहणं, जी माणसं जीवापाड जपली त्यांना सोडून जाणं .... आपलं आत्तापर्यंतचं अस्तित्व पूर्णपणे पुसून टाकून , नव्याने सुरुवात करणं... हे अरुंधतीच्या आयुष्यात आलेलं सगळ्यात मोठं आव्हान आहे....किती वेदनेतून जात असेल ती.... हे गेले सर्व एपिसोड आम्ही सगळेच अरुंधतीची ही वेदना अक्षरशः जगलोय आणि ह्या सगळ्याला आपण प्रेक्षकांनी सुद्धा इतका मायाळू प्रतिसाद दिलात की आम्ही भारावून गेलोय..असंख्य फोन आणि मेसेजेस मधून जाणवतं की अरुंधती मध्ये सगळे किती गुंतलेत....पुन्हा पुन्हा ही अशी भूमिका करायला मिळाल्याबद्दल परमेश्वर आणि रंगदेवतेचे आभार मानावेसे वाटतात.”

First published:
top videos

    Tags: Tv actress, TV serials