मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Aryan Khan: कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरण; आर्यन खानकडे Durg होते की नाही? एनसीबीच्या विशेष चौकशीत झाला मोठा खुलासा

Aryan Khan: कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरण; आर्यन खानकडे Durg होते की नाही? एनसीबीच्या विशेष चौकशीत झाला मोठा खुलासा

Big information reveals about Aryan Khan in Cordelia Cruise drug party case: कॉर्डेलिया क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणात सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. एनसीबीने स्थापन केलेल्या एसआयटीचा अहवाल समोर आला आहे.

  • Published by:  Sunil Desale

मुंबई, 2 मार्च : कॉर्डेलिया क्रूझवर ड्रग्ज पार्टी प्रकरणाचा (Cordelia Cruise drug party case) एनसीबीने (NCB) पर्दाफाश केला आणि एकच खळबळ उडाली. या क्रूझवरुन अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानलाही (Actor Shah Rukh Khan son Aryan Khan) अटक करण्यात आली. या प्रकरणाची संपूर्ण देशात चर्चा झाली. या क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणाच्या तपासासाठी एनसीबीने एक विशेष चौकशी समितीची स्थापना (NCB's SIT) केली होती. या चौकशी समितीचा अहवाल आता आला आहे.

एनसीबीने स्थापन केलेल्या विशेष चौकशी समितीच्या अहवालानुसार अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानकडे कोणतेही अंमली पदार्थ नव्हते. तसेच आर्यन खानचा कोणत्याही मोठ्या ड्रग्ज रॅकेटशी संबंध नाही असंही तपासात समोर आलं आहे. एनसीबीने स्थापन केलेल्या एसआयटी म्हणजेच विशेष चौकशी समितीने चौकशीअंती हा निष्कर्ष काढला आहे. या संदर्भात हिंदुस्तान टाईम्सने वृत्त दिलं आहे.

हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टमध्ये म्हटलं, अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान हा आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा एक भाग होता याचा कुठलाही पुरावा नाहीये. कॉर्डेलिया क्रूझवर टाकण्यात आलेल्या छापेमारीत त्याला अटक करण्यात आले होते.

वाचा : Cruise Drug Party Case: ड्रग्ज प्रकरणात मुंबईतील मंत्र्याला अडकवण्याचा प्लॅन?

एनसीबीने स्थापन केलेल्या एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या माहितीनुसार, आर्यन खानकडे ड्रग्ज नव्हतेच आणि त्यामुळे त्याचा फोन घेऊन त्याचे व्हॉट्सअप चॅट तपासण्याची गरज नव्हती. त्याच्या चॅट्सनुसार तो आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा एक भाग असल्याचा कुठलाही पुरवा नाहीये. एनसीबीने टाकलेल्या धाडीचा कुठलाही व्हिडीओ रेकॉर्ड केलेला नव्हता. तसेच गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून जप्त करण्यात आलेले ड्रग्ज हे सिंगल रिकव्हरी म्हणून दाखवले आहे.

काय आहे प्रकरण?

2 ऑक्टोबर रोजी क्रूझवर एनसीबीने कारवाई करत ड्रग्ज पार्टीचा पर्दाफाश केला होता. या प्रकरणात आर्यन खानला अटक करण्यात आली होती. त्यानंतर 26 दिवसांनी आर्यन खान (Aryan Khan) याला जामीन मिळाल्यावर आर्थर रोड कारागृहातून (Arthur Road Jail) सुटका झाली. मुंबई हायकोर्टाने आर्यन खानला अटी शर्तीसह जामीन मंजूर केला होता.

नवाब मलिकांनी केला होता दावा

आर्यन खानला अटक झाल्यानंतर राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक हे पत्रकार परिषद घेत एनसीबीवर वारंवार आरोप करत होते. काही दिवसांपूर्वी नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत आर्यन खानला अडकवण्याचा प्लॅन होता असंही म्हटलं होतं. आर्यन खान हा स्वत: तिकीट काढून क्रूझवर पार्टीसाठी गेला नव्हता तर त्याला प्रतीक गाभा आणि आमिर फर्निचरवाला यांनी क्रूझवर नेलं होतं. हा संपूर्ण प्रकार किडनॅपिंग आणि खंडणी वसुलीचा आहे. या प्रकरणाचा मास्टरमाईंड हा मोहित भारतीय आहे असा खळबळजनक दावा नवाब मलिक यांनी केला होता.

मोहित कंबोज यांच्या मेव्हण्याच्या माध्यमातून सापळा रचण्यात आला आणि आर्यन खानला क्रूझवर नेलं. त्यानंतर किडनॅप करुन 25 कोटींची मागणी करण्यात आली. डील 18 कोटींवर फायनल झाली. त्यापैकी 50 लाख रुपये घेण्यात आले. मात्र, एका सेल्फीने त्यांचा संपूर्ण खेळ बिघडवला. किडनॅपिंगचा मास्टरमाईंड मोहित कंबोज आहे. वसुलीत मोहित कंबोज (भारतीय) हा वानखेडेंचा साथीदार आहे असंही नवाब मलिकांनी म्हटलं होतं.

First published:

Tags: Aryan khan, Drug case