मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Rajpal Yadav : अभिनेता राजपाल यादवविरोधात तक्रार, विद्यार्थ्यासोबत गैरवर्तन आणि शिवीगाळ

Rajpal Yadav : अभिनेता राजपाल यादवविरोधात तक्रार, विद्यार्थ्यासोबत गैरवर्तन आणि शिवीगाळ

राजपाल यादव

राजपाल यादव

अभिनेता राजपाल यादव अडचणींत सापडला असल्याची बातमी समोर आली आहे. राजपाल यादवच्या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान कर्नलगंजमध्ये सोमवारी गोंधळ झाला.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 13 डिसेंबर : बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव अडचणींत सापडला असल्याची बातमी समोर आली आहे. राजपाल यादवच्या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान कर्नलगंजमध्ये सोमवारी गोंधळ झाला. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान कॉमेडी अभिनेता राजपाल यादववर एका विद्यार्थ्याने स्कूटरने मारहाण केल्याचा आरोप केला आहे. उलट राजपाल यादवनेही विद्यार्थ्यावर आरोप केले आहेत. या प्रकरणामुळे राजपाल यादवचे चाहते चिंतेत पडले आहेत. हे प्रकरण नक्की काय आहे याविषयी जाणून घेऊया.

अल्लापूरचा रहिवासी शशांक श्रीवास्तव एक चित्रपट बनवत आहे, ज्यामध्ये राजपाल यादव महत्त्वाची भूमिका साकारत आहे. चित्रपटाच्या शूटिंगसाठी अभिनेता आणि इतर क्रू मेंबर्स सोमवारी बँक रोड चौकात पोहोचले. ज्या सीनचे चित्रीकरण होणार होते, त्यात अभिनेत्याला स्कूटर चालवायची होती. समोर आलेल्या माहितीनुसार, स्कूटर चालवताना क्लच वायर तुटली, त्यामुळे स्कूटर अनियंत्रित होऊन जवळच उभ्या असलेल्या ई-रिक्षाला धडकली. त्यामुळे शेजारी उभा असलेला विद्यार्थी बालाजी यालाही दुखापत झाली. यावरून बराच गदारोळ झाला.

हेही वाचा -  Urfi Javed विरोधात तक्रार दाखल; नेमकं काय आहे प्रकरण?

विद्यार्थ्याने याला विरोध केला असता युनिटमधील लोकांनी त्याच्याशी गैरवर्तन केले. विद्यार्थ्याने तक्रारीत म्हटले आहे की, युनिटमधील लोकांनी आपल्याशी गैरवर्तन केले, शिवीगाळही केला आणि जीवे मारण्याची धमकीही दिली. विद्यार्थ्याच्या तक्रारीनंतर शूटिंग युनिटकडूनही तक्रार दाखल करण्यात आली होती. परवानगीनुसार चित्रपटाच्या शूटिंगमध्ये अडथळा आणल्याबद्दल युनिटने विद्यार्थी बालाजी विरुद्ध तक्रार केली आहे.

या संपूर्ण प्रकरणाची माहिती मिळताच कर्नलगंज पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि स्कूटर पोलीस ठाण्यात घेऊन गेले. दुसरीकडे, घटनास्थळी जमलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या सहकाऱ्याच्या समर्थनार्थ अभिनेत्याने स्वतः माफी मागावी, अशी मागणी केली. मात्र अभिनेत्याने नकार दिल्यामुळे त्यांनी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.

दरम्यान, सध्या कर्नलगंज पोलिस स्टेशनचे प्रभारी राममोहन राय यांनी सांगितले की, त्यांच्याकडे दोन्ही बाजूंच्या तक्रारी आल्या आहेत. चौकशीनंतर आवश्यक ती कारवाई केली जाईल. त्यामुळे आता याप्रकरणी रामपाल यादव यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

First published:

Tags: Actor, Bollywood, Entertainment, Movie shooting, Shooting