मुंबई, 26 ऑगस्ट : छोट्या पडद्यावर प्रचंड गाजलेला, प्रेक्षकांचा आवडता असा कॉमेडी शो म्हणजेच ‘द कपिल शर्मा शो’. कपिल शर्माच्या या कॉमेडी शोच्या नव्या सीझनची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. आता या शोबद्दल एक मोठी अपडेट समोर आलेली आहे. या कॉमेडी शोचा नवा सीझन येत्या 10 सप्टेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच या शोचा नवा प्रोमो रिलीज करण्यात आला. या सीझनमध्ये काही नवीन कलाकार पाहायला मिळणार आहेत. या नव्या सीझनमध्ये कृष्णाची विनोदी शैली पाहायला मिळणार नाही. त्यामुळे प्रेक्षकांची नाराजी पाहायला मिळत आहे. अशातच प्रसिद्ध कॉमेडियन सुनील पाल यांनी कपिल शर्माच्या समर्थनार्थ एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडिओमधून त्यांनी शो सोडणाऱ्यांवर टीका केली आहे. हा व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल झाला आहे. कृष्णा अभिषेक ‘द कपिल शर्मा’ शोच्या नवीन सीझनचा भाग नसणार हि बातमी समजल्यापासून याविषयी प्रचंड चर्चा सुरु आहे. आता या कॉमेडी शोवर मनापासून प्रेम करणारे चाहते या बातमीने नाराज झाले आहेत. या शो मधील कृष्णा अभिषेक याचं सपना हे कॅरेक्टर प्रचंड लोकप्रिय झालं होतं. पण काही कारणामुळे कृष्णाने या शो मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. अशातच आता प्रसिद्ध कॉमेडियन सुनील पाल यांनी कृष्णावर या कारणामुळे निशाणा साधला आहे.त्यांनी शो सोडण्याबद्दल कृष्णाची खिल्ली उडवणारा एक व्हिडीओ शेअर केला आहे. काय म्हणाले सुनील पाल?
“द कपिल शर्मा शो मधून ऐकले आहे की कृष्णा भाई बाहेर पडणार आहे. प्रत्येकजण असे का करतो? कपिल शर्मा शो चांगला चालला आहे. तुम्हाला चांगली नोकरी मिळत आहे. तुम्हाला बाहेरच्या तुलनेत 100 पट जास्त पैसे मिळत आहेत. तुम्ही बाहेर गेल्यावर काय कराल? त्याच छोट्या मालिका? काही बी-सी ग्रेड चित्रपट करणार का? या लोकांचे काय होते?कपिल शर्माने स्टेज दिला, नाव दिले, पैसे दिले. आणि लोक त्याला सोडून जातात. तू त्याच्या भावाला लुबाडणार का? त्यात दिवसेंदिवस प्रगती होत आहे. पैसे मिळवणे. भरपूर प्रसिद्धी मिळवली. असो, ऑल द बेस्ट. जा. चालता हो. तुम्ही काय करू शकता ते दाखवा!’’ हेही वाचा - Prasad oak : धर्मवीर आनंद दिघेंच्या पुण्यतिथीदिवशी प्रसाद ओकनं केली मोठी घोषणा; ऐकून वाटेल अभिमान तो पुढे म्हणाला, ‘‘कोणताही कलाकार त्याचा शो सोडण्याचा निर्णय घेतो, त्याचा कपिल शर्मावर काहीही परिणाम होणार नाही कारण त्याचा शो दिवसेंदिवस प्रगती करत आहे.’’ कृष्णा अभिषेकने हा शो कपिल शर्मा शो सोडण्याचे कारण कराराचा मुद्दा म्हणून सांगितले आहे. अफवा अशी आहे की अभिनेता आणि प्रॉडक्शन हाऊसमध्ये पैशासाठी करार झाला नाही, त्यानंतर कृष्णाने शो सोडण्याचा निर्णय घेतला. कपिल शर्मा शोमधून वेगळे झाल्याबद्दल बोलताना कृष्णा अभिषेक म्हणाला होता कि, “काही काळासाठी मी कपिल शर्मा टीममधून थोडा ब्रेक घेतला आहे. कपिल शर्मासोबत माझी कोणतीही वैयक्तिक समस्या नाही. तो एक अतिशय प्रेमळ व्यक्ती आहे.”