जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Raju Srivastav Health Update: राजू श्रीवास्तव यांच्या कुटुंबाने घेतला मोठा निर्णय, समोर आली महत्त्वाची अपडेट

Raju Srivastav Health Update: राजू श्रीवास्तव यांच्या कुटुंबाने घेतला मोठा निर्णय, समोर आली महत्त्वाची अपडेट

Raju Srivastav health update

Raju Srivastav health update

प्रसिद्ध आणि लोकप्रिय कॉमेडियन राजू श्रीवास्तव (raju srivastav Health Update) सध्या रुग्णालयात दाखल आहेत. त्यांच्या हेल्थविषयी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 23 ऑगस्ट: प्रसिद्ध आणि लोकप्रिय कॉमेडियन राजू श्रीवास्तव (raju srivastav Health Update) सध्या रुग्णालयात दाखल आहेत. त्यांना मागच्या काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आल्याने ताबडतोब रुग्णालयात दाखल केलं होतं. तेव्हापासून त्यांच्या प्रकृतीविषयी वेगवेगळी माहिती समोर येत आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सतत सांगितलं जातंय. अशातच राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीविषयी नवी अपडेट समोर आली आहे. ‘राजू श्रीवास्तव 10 ऑगस्टपासून सतत व्हेंटिलेटरवर आहेत आणि त्यांना शुद्धीवर येण्यासाठी दोन आठवड्यांपेक्षा जास्त वेळ लागू शकतो असे सांगण्यात येत आहे. राजूच्या कुटुंबीयांनी त्यांच्यासाठी खास पूजा ठेवली असून दिल्लीतच त्यांचा मोठा भाऊ सीपी श्रीवास्तव यांच्या घरी ही पूजा सुरु आहे. पत्नी शिखापासून ते संपूर्ण कुटुंब या पूजेत सामील आहे’, असं टीव्ही 9 नं दिलेल्या ताज्या अहवालात म्हटलं आहे. हेही वाचा  - पतीचा संशयास्पद मृत्यू, भाजप प्रवेश अन् आता सोनाली फोगट यांनीही घेतला जगाचा निरोप, ‘त्या’ 6 वर्षात काय घडलं? श्रीवास्तव यांचे चाहते सध्या त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करताना दिसत आहेत. ट्विटरपासून अगदी सगळ्याच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांच्यासाठी प्रार्थना केली जात आहे. यासोबतच त्यांनी चाहत्यांना अफवांवर लक्ष देऊ नका असं आवाहनही केलं आहे. दरम्यान, एका अज्ञात व्यक्तीने आयसीयूमध्ये जाऊन राजू श्रीवास्तव यांच्यासोबत सेल्फी काढण्यास सुरुवात केली. या अनोळखी व्यक्तीला पाहून राजू श्रीवास्तव यांचे कुटुंबीय त्याच्या सुरक्षेसाठी चिंतित झाले आहेत. आता आयसीयूच्या बाहेर रक्षक तैनात करण्यात आले असून परवानगीशिवाय कोणालाही आत जाता येणार नाही. हेही वाचा -  Sonali Phogat : गोव्याला फिरायला गेलेल्या असतानाच प्रसिद्ध टिकटॉक स्टार आणि भाजप नेत्या सोनाली फोगट यांचं निधन 10 ऑगस्ट रोजी राजू श्रीवास्तव यांना जिममध्ये वर्कआउट करताना हृदयविकाराचा झटका आला, त्यानंतर कॉमेडियनला तात्काळ दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असली तरी त्यांना अजून शुद्धीवर आलेले नाही. त्यामुळे सगळेच चिंतीत असून ते ठीक होण्यासाठी प्रार्थना करतायेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात