Home /News /entertainment /

3 महिन्यांच्या तुरुंगवासाबद्दल विनोदी अभिनेता राजपाल यादवने अखेर सोडलं मौन; म्हणाला...

3 महिन्यांच्या तुरुंगवासाबद्दल विनोदी अभिनेता राजपाल यादवने अखेर सोडलं मौन; म्हणाला...

राजपाल यादव याने आपल्या कामातून प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली आहे

    मुंबई, 15 ऑक्टोबर : बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव (Rajpal Yadav) याला 2018 मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने तीन महिन्यांची शिक्षा सुनावली होती. विनोदी अभिनेता राजपाल यादव याच्यावर लोनचे पैसे न फेडल्याचा आरोप होता. राजपाल यादवची चित्रपट कंपनी श्री नौरंग गोदावरी एन्टरटेनमेंटने दिल्ली स्थित एका कंपनीकडून 5 कोटी रुपयांचं लोन घेतलं होतं. मात्र हे लोन फेडू शकला नाही, असा आरोप करीत दिल्लीस्थित कंपनीने राजपाल यादवविरोधात केस दाखल केली होती. अभिनेत्याने 2010 मध्ये 'अता पता लापता' या चित्रपटात डायरेक्टर डेब्यू करण्यासाठी पैसे घेतले होते. त्यात या प्रकरणात तुरुंगवास झाल्यामुळे राजपाल यादवने आपलं दु:ख व्यक्त केलं आहे. तो म्हणाला की, 15 वर्षांपासून त्यांनी यावर कोणाशीही चर्चा केली नाही. राजपाल यादवने चित्रपटात आपल्या दमदार सादरीकरणाच्या जोरावर ओळख निर्माण केली आहे. त्यातच जेव्हा त्यांना शिक्षा सुनावण्यात आली, तेव्हा सर्वांना धक्काच बसला होता. नुकतीच टाइम्स नाऊशी बातचीत करताना राजपाल यादव म्हणाला की, 15 वर्षांत मी माझ्या बचावासाठी केव्हाच बोललोनाही, मी नकारात्मक विचार करीत नाही. कोण सकारात्मक..कोण नकारात्मक आहे याबद्दल मला माहित नाही. मात्र मला माझं काम माहीत आहे. मी कर्म करीत आलो आहे. त्यामुळे भूतकाळाचे ओझे डोक्यावर ठेवू इच्छित नाही. लोकांना जे म्हणायचं..ते म्हणू  देत. जर माझं काम पसंत केलं जाईल, तर ते पुढे जाईल. हे ही वाचा-मराठी भाषेच्या मुद्द्यावरुन राज आक्रमक; ॲमेझॉन-फ्लिपकार्टला मनसे स्टाइल इशारा तो पुढे म्हमाले की, प्रत्येक नव्या दिवशी सुर्याची किरणेही वेगळी असतात. तसंच राजपाल यादव आहे. तो आपल्या क्रिएटिव्हीटीसाठी ओळखला जातो आणि त्याला प्रेक्षकांचं प्रेम मिळतं. मला खूप प्रेम मिळालं आहे, आणि मला याचा आनंद आहे. गेल्या 20 वर्षांपासून राजपाल यादव बॉलिवूडशी जोडला गेला आहे. यादरम्यान काॅमेडीपासून इमोशनल सीन्समध्ये प्रत्येक भूमिकेत राजपालने प्रेक्षकांना जिंकलं आहे. त्यातच तो आगामी हंगामा-2 या चित्रपटाची तयारी करीत आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Bollywood, Rajpal yadav

    पुढील बातम्या