सुशांतच्या मृत्यूची चेष्टा करणाऱ्या या VIDEO मुळे कॉमेडियन अडचणीत; नेटकऱ्यांनी धडा शिकवल्यानंतर मागितली माफी
स्टॅन्ड अप कॉमेडियन डॅनियल फर्नांडिज (Daniel Fernandez) याच्याविरुद्ध सोशल मीडियावर टीकेची झोड उठवली जात आहे. त्यानं दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या (Sushant singh rajput) मृत्यूवर आधारित कॉमेडी केली आणि हा चेष्टेचा विषय बनवला. पाहा काय बोललाय तो VIDEO
मुंबई, 13 जानेवारी: हिंदू देवतांवर (Hundu god) भाष्य केल्यामुळे स्टँड अप कॉमेडियन (Stand up Comedian) मुनवर फारुकीला (Munawar faruqui) काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती. आता आणखी एक कॉमेडियन सोशल मीडियावर (Social media) ट्रोल (Trolling) होताना दिसत आहे. या कॉमेडियनचं नाव डॅनियल फर्नांडिझ (Daniel Fernandez) असून सोशल मीडियावर त्याच्याविरुद्ध टीकेची झोड उठवली जात आहे. त्यानं दिवंगत अभिनेते सुशांतसिंग राजपूतच्या मृत्यूला (Sushant singh rajput) चेष्टेचा विषय बनवल्याचा आरोप डॅनियलवर आहे.
डॅनियल फर्नांडिज हा मुंबईचा स्टँड अप कॉमेडियन आहे. डॅनियल हा बहुधा डार्क कॉमेडीसाठी ओळखला जातो. डॅनियलच्या काही क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये तो सुशांतसिंग राजपूतच्या निधनावर विनोद करताना दिसतो. सुशांतच्या मृत्यूनंतर रिया चक्रवर्तीवर झालेल्या आरोपांवरही त्याने विनोद केले आहेत.
The worst thing you could do as a stand-up comedian is making jokes on a tragedy.
Dislike and mass report this video for making jokes on Sushant Singh Rajput death.https://t.co/gqrKX7BhqF
This comedian is making fun of a dead person who can't defend himself.
The level of humour is crass, to say the least.
It does not matter whether Sushant Singh Rajput died by suicide or it was homicide, what give you the license to defame the dead? https://t.co/LnMCe3s8hD
डॅनियलने मानसिक आरोग्य आणि जस्टिस फॉर सुशांत (#JusticeForSushant) यांसारख्या हॅशटॅगवरही टीका करत खिल्ली उडवली आहे. व्हिडीओमध्ये डॅनियलने कंगना रणौतला 'सीबीआय डायरेक्टर' असंही म्हटलं आहे. या व्हिडिओ क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरल जेव्हापासून व्हायरल झाल्या आहेत, तेव्हापासून लोकं डॅनियला ट्रोल करताना दिसत आहेत. बऱ्याच लोकांनी त्याच्या अटकेची मागणीही केली आहे.
हा आहे तो VIDEO
या व्हिडीओतला विषय पाहून अनेक नेटकऱ्यांनी त्याचा निषेध नोंदवला. हा विनोदाचा विषय नसल्याचं नमूद करत डॅनियलवर भरपूर टीका झाली.
नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर डॅनियलवर टीकेची झोड उठवल्यानंतर, डॅनियलने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत माफी मागीतली आहे. त्यानं पोस्टमध्ये लिहीलं की, दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या मृत्यूवर विनोद केल्यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे मी दिलगिरी व्यक्त करत आहे.