जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / VIDEO : 8 महिन्यापूर्वी अभिनेत्रीच्या गुडघ्याला झाली होती दुखापत आणि आता चालवतेय सुसाट बुलेट

VIDEO : 8 महिन्यापूर्वी अभिनेत्रीच्या गुडघ्याला झाली होती दुखापत आणि आता चालवतेय सुसाट बुलेट

VIDEO : 8 महिन्यापूर्वी अभिनेत्रीच्या गुडघ्याला झाली होती दुखापत आणि आता चालवतेय सुसाट बुलेट

अभिनेत्री अक्षया नाईक कलर्स मराठीवरील ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेमुळे महाराष्ट्राच्या घऱाघरात पोहचली. या मालिकेत ती लतिकाची भूमिका साकारताना दिसते. आठ महिन्यापूर्वी शुटिंग करत असताना तिच्या पायाला दुखापत झाली होती.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 28 फेब्रुवारी- अभिनेत्री अक्षया नाईक कलर्स मराठीवरील ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेमुळे महाराष्ट्राच्या घऱाघरात पोहचली. या मालिकेत ती लतिकाची भूमिका साकारताना दिसते. आठ महिन्यापूर्वी शुटिंग करत असताना तिच्या पायाला दुखापत झाली होती. पायाला दुखापत झाल्यानं अक्षयाला दोन पावलं चालणंही कठीण झालं होतं. अक्षयानं सोशल मीडियावर पोस्ट लिहीत ही माहिती तिच्या चाहत्यांनी दिली होती. आता आठ महिन्यानंतर असाच एक मालिकेच्या सेटवरील बुलेट चालवण्याचा अनुभव शेअर केला आहे.सोबत तिनं व्हिडिओ देखील शेअर केला. चाहत्यांनी देखील दुखपतीनंतर अक्षयानं दाखवलेल्या धाडसाचं कौतुक केलं आहे. अक्षयानं पोस्टमध्ये म्हटलं आहे की, ८ महिन्यांपूर्वी शूटिंग करताना गुडघ्याला दुखापत झाली आणि अगदी उभासुद्धा राहता येईना. भिती इतकी की मला पूर्वीसारखा नाचता, बाईक चालवायला किंवा फिरायला जमेल का ? २ महिन्यांपूर्वी मला एका सीनसाठी साधी स्कूटर चालवायची होती तरी छातीत धस झालं होतं. हाथ थरथरत होते, आत्मविश्वासच नव्हता. फार वाईट वटलं त्या दिवशी. पण मनाशी एक गोष्ट मात्र ठरवली होती, की ही भीती फार दिवस नाही टिकवणार. वाचा- अनिल कपूर यांना येतेय लक्ष्मीकांत बेर्डेंची आठवण; फोटो शेअर करत झाले इमोशनल गेल्या आठवड्यात सांगितलं सीनमध्ये बाईक चालवायची होती. इच्छा फार होती पण जमणार की नाही याची शंका होती. मग शेवटी घातली माझी knee cap आणि म्हंटला आज होऊन जाऊदे काय व्हायचंय ते. मग काय ? आधी moped चालवून पहिली, जरा confidence वाढला माझा आणि मग काय ? चालवली ना बुलेट !!!! गेले ना सुसाट !!!!! खूप बरं वटलं. इच्छाशक्ती पाहिजे बाकी काही नाही !!!!

जाहिरात

अक्षयाच्या पायाच्या लिगामेंटला दुखापत झाली होती. मालिकेच्या शुटिंगवेळी तिच्या पायाला दुखापत झाली होती.पायाच्या दुखण्यानं अक्षयाला चालणं कठीण झालं होतं. त्यामुळे सेटवर अक्षयाला व्हिलचेअरचा वापर करावा लागत होता. अक्षयानं व्हिलचेअरवर बसलेला तिचा व्हिडिओ देखील चाहत्यांसोबत शेअर केला होता. शिवाय तिच्या दुखापतीबद्दल तिनं पोस्ट लिहित माहिती झाली आहे.

News18लोकमत
News18लोकमत

marathi actress mrinal-kulkarni-writes-a-special-post-for-son-virajas-kulkarni on his birthday-sp अक्षया आता पूर्णपणे बरी झाल्य़ाचे दिसत आहे. तिनं केलेलं धाडस पाहून चाहते तिचं कौतुक करत असतात. मालिका, सिनेमाच्या सेटवर अनेक कलाकारांना शुटिंगवेळी दुखापत होत असते. अशावेळी काळजी घेणे गरजेचे आहे. अनेकवेळा कलाकार सगळं बाजूला ठेवत शुटिंगला महत्त्व देताना दिसतात. कारण म्हणतात ना शो मस्ट गो ऑन ..कलाकाराला थांबून चालत नाही. अक्षया नाईकनं देखील न थांबता मालिकेचं शुटिंग पूर्ण केलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात