Valentine Special : अप्सरा पडली प्रेमात, पाहा कोणाला करत आहे डेट

Valentine Special : अप्सरा पडली प्रेमात, पाहा कोणाला करत आहे डेट

Valentine Month सुरु झाला आहे आणि सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींनी त्यांचे ‘Valentine’ कोण आहेत हे आपल्या सोशल मीडियावर जाहीर केलं आहे.

  • Share this:

मुंबई, 3 फेब्रुवारी : Valentine Month सुरु झाला आहे आणि सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींनी त्यांचे ‘Valentine’ कोण आहेत हे आपल्या सोशल मीडियावर जाहीर केलं आहे.

‘अप्सरा’ सोनाली कुलकर्णीने ती कुणाच्या प्रेमात पडली आहे हे एका पोस्टद्वारे सांगितलं आहे. गेली अनेक महिने ती कुणाच्या प्रेमात आहे हे गुलदस्त्यात होतं पण आता सोनालीने स्वत:च जाहीर केलंय. दुबईत झिपलाईन अ‍ॅडव्हेंचरचा व्हि़डीओ पोस्ट करून तिने तिचा ‘पार्टनर’ कोण हे सांगितलं.  नवीन प्रवासाला माझ्या पार्टनरसोबत सुरुवात करतेय. चढ-उतार, साहसासाठी सज्ज आहे. असं कॅप्शन देत सोनालीने हा अ‍ॅडव्हेंचर व्हिडीओ शेअर केला आहे. कुणाल बेनोडेकर या दुबईतील चार्टर्ड अकाऊंटंटसोबत ती सध्या रिलेशनशिपमध्ये आहे. लवकरच ती कुणालसोबत लग्नगाठ बांधणार असल्याचं बोललं जात आहे.

 

View this post on Instagram

 

Embarking on a new journey with my partner ....ready for all the highs/lows and adventure! @keno_bear #jebeljais #atthetopofuae

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588) on

तर दुसरीकडे अभिनेत्री मानसी नाईकने तिच्या वाढदिवशी एक पोस्ट करत आपल्या ‘Soul mate’ बद्दल सांगितलं आहे.  प्रदीप खेरा या बॉक्सर आणि मॉडेलच्या ती प्रेमात पडली आहे. याचा खुलासा मानसी आणि प्रदीप यांनी सोशल मीडियाद्वारे स्वत:च केला आहे. व्हॅलेंटाईन चा महिना असणाऱ्या फेब्रुवारीत मानसीने हा खुलासा केलाय. हे खरं आहे की कोणत्या सिनेमा अथवा अल्बमचं प्रमोशन आहे हे येत्या काळातच कळेल.

First published: February 3, 2020, 4:24 PM IST
Tags:

ताज्या बातम्या