मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

CHYD: 'शिक्षकांचे प्रश्न सुटत नसतील तर शिक्षणाचे कसे सुटणार...?' हे पत्र ऐकून डिसले गुरुजीही झाले भावुक

CHYD: 'शिक्षकांचे प्रश्न सुटत नसतील तर शिक्षणाचे कसे सुटणार...?' हे पत्र ऐकून डिसले गुरुजीही झाले भावुक

इतर वेळी खळखळून हसवणारा चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम 'पोस्टमनकाकांचं पत्र' या सदरावेळी मात्र सर्वांनाच भावुक करतो. अभिनेता-कॉमेडियन सागर कारंडे (Sagar Karande) ही पोस्टमन काकांची भूमिका गेली अनेक वर्ष चोख अभिनय करत पार पाडत आला आहे. '

पुढे वाचा ...
  • Published by:  Janhavi Bhatkar

मुंबई, 26 जानेवारी: झी मराठीवरील (Zee Marathi) चला हवा येऊ द्या (Chala Hawa Yeu Dya) हा कार्यक्रम गेली अनेक वर्ष प्रेक्षकांना हसवत आहे. कधी एखाद्या चित्रपटाची, मालिकेची कहाणी आपल्या पद्धतीने मांडून किंवा कधी स्कीटच्या माध्यमातून ही सर्व मंडळी प्रेक्षकांना आपलसं करत आहेत. अगदी हिंदी चित्रपट सृष्टीतीलही अनेकांनी या व्यासपीठावर हजेरी लावली आहे. इतर वेळी खळखळून हसवणारा हा कार्यक्रम 'पोस्टमनकाकांचं पत्र' या सदरावेळी मात्र सर्वांनाच भावुक करतो. अभिनेता-कॉमेडियन सागर कारंडे (Sagar Karande) ही पोस्टमन काकांची भूमिका गेली अनेक वर्ष चोख अभिनय करत पार पाडत आला आहे. 'चला हवा येऊ द्या'च्या लेटेस्ट कार्यक्रमातही असंच काहीसं घडलं आहे.

ज्येष्ठ कायदेज्ज्ञ अॅड. उज्ज्वल निकम, नेत्रतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने, वरिष्ठ आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील आणि ग्लोबल शिक्षक पुरस्कारप्राप्त रणजित डिसले गुरुजी इत्यादी मान्यवर मंडळी भारताच्या 72 व्या प्रजासत्ताक दिन स्पेशल एपिसोडमध्ये उपस्थित होती. यावेळी सागर कारंडे अर्थात पोस्टमन काकांनी विनाअनुदानित शिक्षकांची व्यथा मांडली. यावेळी अनेक विद्यार्थ्यांच्या सोडवणाऱ्या डिसले गुरुजींच्या डोळ्यातही पाणी तरंगलं. अरविंद जगताप यांच्या लेखणीची कमाल या पत्रातून ऐकायला मिळाली. जगताप यांनी लिहिलेल्या इतर पत्राप्रमाणेच या पत्रानेही काळजात चर्रर झालं.

(हे वाचा-मराठी सेलिब्रिटी कपल अडकलं लग्नबंधनात! शाही लग्नसोहळ्याचे PHOTO VIRAL)

'शिक्षकांचे प्रश्न सुटत नसतील तर शिक्षणाचे कसे सुटणार...?'

हे पत्र एका शिक्षकाच्या मुलानं लिहिलं आहे. त्याने या पत्रामध्ये असं म्हटलं आहे की, 'माझे वडील एका विनाअनुदानित शाळेत शिक्षक म्हणून शिकवतात. आमच्या वर्गातील काही पोरं शाळेत जितक्या पैशाचे चॉकलेट खातात ना, तेवढे पैसे माझ्या प्राध्यापक असलेल्या बापाला पगारातूनही मिळत नाही. माझा बाबा 4 वर्ष एकाच शाळेवर जवळपास फुकट काम करतोय. गुरुजी, तुम्हाला विश्वास बसणार नाही पण कॉलेजमध्ये माझ्या वडिलांच्या हाताखाली शिकलेली पोरं कमवायला लागली आहेत. ती धाब्यावर खायला प्यायला येतात, त्यांना माझे वडील वेटर म्हणून सर्विस देतात. वर्गात नीट शिकत नाहीत म्हणून माझ्या वडिलांनी शिक्षा केलेली मुलं धाब्यावर एका बैठकीत हजार रुपये बिल करतात. कधी कधी वाटतं ती पोरं माझ्या वडिलांनाच एवढं शिकायची काय गरज होती म्हणून शिक्षा करत असतील. आपल्या विद्यार्थ्यांनी बील देताना दिलेली टीप माझ्या वडिलांना खूप काही शिकवून जात असणार. तुम्हाला पुरस्कार मिळाल्यावर सगळे मंत्री, राज्यपाल तुमच्यासोबत कौतुकाने फोटो काढत होते, म्हणून तुम्हाला पत्र लिहिलं, कदाचित तुमचं ऐकतील. शिक्षकांचेच प्रश्न सुटत नसतील तर शिक्षणाचे प्रश्न कसे सुटणार? गुरुजी तुम्ही शिक्षणासाठी QR कोड बनवलात ना? आता नोकरीपासून वंचित शिक्षकांसाठी एखादा क्यूआर QR कोड बनवा. हे कोडं देखील तुमच्या कोडमुळे सुटू द्यात.'

(हे वाचा-VIDEO : गायिकेने असा छेडला सूर, कुत्रा-मांजरांपासून माणसांची झाली अशी अवस्था)

हे पत्र ऐकून ग्लोबल शिक्षक पुरस्कारप्राप्त रणजित डिसले गुरुजी यांना देखील अश्रू अनावर झाले होते. यामुळे देखील विनाअनुदानित शाळांच्या समस्यांबाबत प्रशासनाला जाणीव होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

First published:

Tags: Zee Marathi