मुंबई, 16 सप्टेंबर : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (sushant singh rajput) मृत्यूनंतर बॉलिवूडमधील नेपोटिझमवर जोरदार चर्चा सुरू झाली. अनेक स्टारकिड्सना लक्ष्य केलं जाऊ लागलं. त्यापैकीच एक म्हणजे अभिनेता चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे. अनन्या पांडेवर होऊ लागलेल्या टिकेनंतर तिचे वडील चंकी पांडे पहिल्यांदाच व्यक्त झाले आहे. आपल्या मुलीवर होणाऱ्या टिकेला आणि एकंदरच बॉलिवूड नेपोटिझमबाबत चंकी पांडेने प्रतिक्रिया दिली आहे. चंकी पांडे म्हणाला, “कुणी काही बोलत असेल तर त्याला फारसं गांभीर्याने न घेता, त्याचा फारसा विचार न करता पुढे निघून जावं. आपण काय करायला हवं हे आपल्यावर अवलंबून आहे. एक अभिनेता, फिल्मस्टार, सेलिब्रिटी म्हणून काही प्लस तर काही मायनस पॉइंट्स असतात. सध्या परिस्थिती अशी आहे की ज्यामुळे लोक खूपच संवेदनशील झाले आहेत. लोकांमध्ये चिंता आणि असुरक्षिततेची भावना वाढली आहे. माझ्यासोबतदेखील असं झालं आहे. आज मी 57 वर्षांचा आहे. माझ्या 33 वर्षांच्या करिअरमध्ये खूप काही मोठं केलं असं म्हणू शकत नाही. जर मला असं वाटतं, तर आताची तरुण पिढी कोणत्या परिस्थितीतून जात असेल याची कल्पना मला आहे” हे वाचा - सुशांत सिंह राजपूतचे ‘ते’ 15 कोटी रुपये नेमके कुठे? CBI ला सापडला धागादोरा “इनसाइडर आणि आऊटसाइडर असा संघर्ष मागील अनेक वर्ष सुरू आहे. गेल्या 50 वर्षांपूर्वी देखील हेच म्हटलं जात आहे. सध्या कोविडच्या या संकटात लोकांकडे दुसरं करण्यासारखं काहीच नाही. या गोष्टींसाठी अधिक वेळ मिळतो आहे त्यामुळे सोशल मीडियावर याची चर्चा मोठ्या प्रमाणात होते आहे”, असं चंकी म्हणाला. हे वाचा - बॉलिवूडमध्ये नवं नाट्य; जया बच्चन यांना पाठिंबा देण्यासाठी बिग बींची एन्ट्री सोशल मीडियाविषयी बोलताना चंकी म्हणाला की, “सोशल मीडिया हे एक साधन आहे आणि त्याप्रमाणेच वापरलं गेलं पाहिजे. तुम्ही त्याला व्यक्तिगतरित्या घ्यायला नको. सोशल मीडियावर तुमच्याविषयी काय बोललं जात आहे हे फार गांभीर्याने घेण्याची गरज नसल्याचे देखील त्याने यावेळी म्हटले. लोकांशी संवाद साधण्यासाठी हे उत्तम माध्यम आहे. तुम्ही तिथं काय देणार हे तुमच्या हातात आहे”
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.