जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / 'छोटी सरदारनी' फेम अभिनेत्रीला झाला होता गंभीर आजार; अभिनेत्रीने व्यक्त केल्या यातना

'छोटी सरदारनी' फेम अभिनेत्रीला झाला होता गंभीर आजार; अभिनेत्रीने व्यक्त केल्या यातना

'छोटी सरदारनी' फेम अभिनेत्रीला झाला होता गंभीर आजार; अभिनेत्रीने व्यक्त केल्या यातना

‘छोटी सरदारनी’ (Choti Sarrdaarni) या मालिकेतून अभिनेत्री निम्रत कौर अहलुवालिया (Nimrit Kaur Ahluwalia) घराघरात पोहोचली आहे. तिची ही पहिलीच मालिका आहे. तिने अल्पावधीतच प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. मात्र तब्येतीच्या कारणामुळे तिला लगेचच या शोला रामराम करावा लागला होता.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 9 जुलै-  ‘छोटी सरदारनी’ (Choti Sarrdaarni)  या मालिकेतून अभिनेत्री निम्रत कौर अहलुवालिया (Nimrit Kaur Ahluwalia) घराघरात पोहोचली आहे. तिची ही पहिलीच मालिका आहे. तिने अल्पावधीतच प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. मात्र तब्येतीच्या कारणामुळे तिला लगेचच या शोला रामराम करावा लागला होता. अभिनेत्रीने डेब्यू शोमधून ब्रेक घेतल्यानंतर आता आपली मानसिक स्थिती आणि तिचा संघर्ष याबद्दल खुलासा केला आहे. निम्रतने सांगितले की, कामातून 40 दिवसांचा ब्रेक घेणं ही तिच्यासाठी पर्यायापेक्षा जास्त गरज होती.आपण करिअरच्या सुरुवातीलाच हा निर्णय घेत एक धाडसी पाऊल उचलल्याचं तिनं म्हटलं आहे. हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत निम्रत कौर अहलुवालियाने सांगितले की, ‘‘मानसिक आरोग्याबाबत जागरूकतेच्या अभावामुळे लोकांना तिची स्थिती समजू शकली नाही. ती पुढे म्हणाली की, चिंता आणि नैराश्य यासारखे शब्द सर्वांना माहीत आहेत, परंतु तपासणीदरम्यान त्यांना ‘ब्रेन बर्नआउट’ (Brain Burnout) नावाचा आजार झाल्याचं निदान झालं आहे’’.

News18

अभिनेत्रीने पुढे सांगितले की, ब्रेन बर्नआउट ही भावनात्मक, शारीरिक आणि मानसिक थकवा, अत्याधिक आणि दीर्घकाळापर्यंत तणावामुळे उद्भवणारी स्थिती आहे. यामध्ये व्यक्तीला भावनिकरित्या थकल्यासारखे वाटते आणि अशातच ती व्यक्ती आपल्या सततच्या मागण्या पूर्ण करू शकत नाही. निम्रतने सांगितले की, प्रत्येकजण त्याच्या स्थितीबद्दल संभ्रमात होता आणि लोकांनी असा आभास निर्माण केला की तिच्या वैयक्तिक आयुष्यात काहीतरी चुकीचं झालं आहे’. **(हे वाचा:** ‘तारक मेहता..‘मध्ये दयाबेनची एन्ट्री कन्फर्म; टिव्हीवरील ही प्रसिद्ध सून घेऊ शकते दिशा वकानीची जागा ) निम्रतने एका न्यूज पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, ‘डॉक्टरांनी तिला सांगितलं होतं की, ती कामा करण्याच्या स्थितीत नाहीय. डॉक्टरांचा सल्ला हा तिच्यासाठी पर्याय नसून गरज असल्याचं तिनं म्हटलं होतं.निम्रतने सांगितलं की ती अशी व्यक्ती आहे जी कधीही कठोर परिश्रम करायला घाबरत नाही. ती म्हणते, “जेव्हा तुम्ही मध्यमवर्गीय कुटुंबातून येता तेव्हा कठोर परिश्रम हे तुमच्या रक्तातच भिनलेलं असतं’.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात