मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'छोटी बहू' फेम अविनाश सचदेवचा पलकसोबत BreakUp! गेल्यावर्षी झाला होता 'रोका'

'छोटी बहू' फेम अविनाश सचदेवचा पलकसोबत BreakUp! गेल्यावर्षी झाला होता 'रोका'

 'छोटी बहू'    (Choti Bahu)   या मालिकेतून देवच्या रूपात घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे अविनाश सचदेव    (Avinash Sachdev)   होय.

'छोटी बहू' (Choti Bahu) या मालिकेतून देवच्या रूपात घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे अविनाश सचदेव (Avinash Sachdev) होय.

'छोटी बहू' (Choti Bahu) या मालिकेतून देवच्या रूपात घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे अविनाश सचदेव (Avinash Sachdev) होय.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 16 जानेवारी-   'छोटी बहू'    (Choti Bahu)   या मालिकेतून देवच्या रूपात घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे अविनाश सचदेव    (Avinash Sachdev)   होय. अविनाश आपल्या प्रोफेशनल लाईफसोबतच पर्सनल लाईफमुळे चर्चेत असतो. नुकताच समोर आलेल्या एका माहितीनुसार, अभिनेता अविनाश सचदेवचा ब्रेकअप   (Breakup)  झाला आहे. अविनाश आणि पलक पुरस्वानीच्या  (Palak Purswani)   चार वर्षाच्या रिलेशनशिपचा द एन्ड झाला आहे.

अभिनेता अविनाश सचदेव आणि पलक पुरस्वानी गेल्या चार वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. इतकंच नव्हे तर या दोघांनी गेल्यावर्षी रोकासुद्धा केला होता. त्यांनतर ते लवकरच लग्न करतील अशी चाहत्यांना अपेक्षा होती. परंतु आता त्यांचा ब्रेकअप झाल्याचं समोर आलं आहे. पलक पुरस्वानीने नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये आपलं आणि अविनाशचं ब्रेकअप झाल्याचं मान्य केलं आहे.

टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत पलक पुरस्वानीने म्हटलं आहे, 'प्रत्येक नात्यामध्ये चढउतार येत असतात. अनेक अडचणी येत असतात. आणि ही प्रत्येक नात्यातील सर्वसामान्य गोष्ट आहे. परंतु काही गोष्टी अशा असतात ज्याकडे तुम्ही दुर्लक्ष करू शकत नाही. माझ्यासाठी स्वाभिमान आणि सत्य खूप महत्वाचं आहे. प्रेमापेक्षासुद्धा आधी या गोष्टी माझ्यासाठी महत्वाच्या आहेत. मला अगदी खोलात नाही जायचं. मी सध्या खूप चांगल्या स्पेसमध्ये आहे. मी त्यांना त्या गोष्टीसाठी माफ केलं आहे ज्याची त्यांनी कधीच माफीसुद्धा मागितली नाही'. असं म्हटलं पलकने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by (@palak.purswani)

पलक आणि अविनाश गेली चार वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. त्यांनी गेल्यावर्षी रोकासुद्धा केला होता.इतकंच नव्हे तर त्यांनी मिळून एक रेस्टोरंटसुद्धा सुरु केलं होतं. परंतु कोरोना महामारी आणि नंतर लॉकडाऊनमुळे ते रेस्टोरंट बंद करावं लागलं. याबद्दलही पलकने स्पष्टीकरण दिलं आहे. ती म्हणाली, 'कोरोना महामारीमध्ये अनेक लोकांचे व्यवसाय संपुष्ठात आले आहेत. त्यात आमचंसुद्धा आम्ही ब्रेकअपच्या खूप आधी आमचं रेस्टोरंट बंद केलं होतं. त्यामुळे त्याचा आणि ब्रेकअपचा काहीही संबंध नाही'.

(हे वाचा:sushmita सोबतच्या ब्रेकअपनंतर पहिल्यांदाच बॉयफ्रेंड रोहमनने व्यक्त केली भावना)

तसेच पलक म्हणाली, 'ब्रेकअप झाल्यांनतरच आयुष्य फारच कठीण असतं. ब्रेकअप माणसांमध्ये कटुता निर्माण करतं. मी विचार केला काही लोक तुमच्या इतिहासाचा भाग असतात. तर काही लोक तुमच्या नशिबाचा. त्यांच्या हालचालींनी मला पुढे सरकण्यास मदत केली आहे. मी सध्या मूव्ह ऑन केलं आहे'.

First published:

Tags: Break up, Entertainment, Tv actor