मुंबई, 15 जानेवारी: सध्या देशात कोरोनाबाधित (Corona) आणि ओमिक्रॉनच्या (Omicron) रुग्णांची संख्या वाढत आहे. अनेक बॉलिवूड सेलेब्रिटींना (Bollywood Celebrities) कोरोनाचा संसर्ग होत असल्याचं दिसून येत आहे. मॉडेल, अभिनेता आणि अभिनेत्री सुश्मिता सेनचा एक्स बॉयफ्रेंड (Ex-Boyfriend) रोहमन शॉल (Rohman Shawl) यानंदेखील नुकतीच कोरोनावर मात केली आहे. `कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतरचा कालावधी मला नवा धडा देणारा ठरला`, असं रोहमननं नमूद केलं आहे. `हा कालावधी मला खूप काही शिकवून गेला``, असं रोहमननं सांगितलं. याबाबतची माहिती `बॉलिवूड लाइफ डॉट कॉम`नं दिली आहे. अभिनेत्री सुश्मिता सेन (Sushmita Sen) आणि रोहमनचं तीन वर्षांचं नातं (Relationship) संपुष्टात आलं. यामुळे त्यांचे चाहते काहीसे हळवे झाल्याचं पाहायला मिळालं. सुश्मितानं इन्स्टाग्रामच्या (Instagram) माध्यमातून ब्रेकअपची (Breakup) घोषणा केली होती. या पोस्टमध्ये ती म्हणते, की ``आम्ही मित्र म्हणून सुरूवात केली आहे. आम्ही मित्र आहोत. दीर्घकाळ असलेलं नातं आता संपलंय. आता फक्त प्रेम राहिलंय``. या पोस्टमध्ये सुश्मितानं `नो मोअर स्पेक्युलेशन्स` आणि `चेरिश्ड मेमरीज` असे दोन हॅशटॅगही (Hashtag) अॅड केले होते. या पोस्टवर रोहमननं हार्ट इमोजीसह `ऑलवेज` अशी कमेंट केली होती. एका कमेंटमध्ये त्यानं तिचा `फॅमिली` असाही उल्लेख केला. सुश्मिताच्या मुली रेनी आणि अलिसासोबत रोहमनचं जवळचं नातं आहे. काही काळापूर्वी रोहमनला कोरोनाचा संसर्ग झाला होता. हा काळ त्याच्यासाठी काहीसा कठीण ठरला. रोहमननं शुक्रवारी इन्स्टाग्रामवर फॅन्ससाठी `आस्क मी एनिथिंग` (Ask me anything) या प्रश्नोत्तराच्या सेशनचं आयोजन केलं होतं. यावेळी रोहमननं कोरोना संसर्ग झाल्यावर आलेले अनुभव आणि चित्रपटसृष्टीतील पदार्पणाविषयी भाष्य केलं. `या कोरोना संसर्गादरम्यान आणि त्यातून बरं होताना तू जीवनाबद्दल कोणता धडा शिकलास`, असा प्रश्न एका युझरनं रोहमनला विचारला. त्यावर रोहमन म्हणाला, की `मी सर्वात मोठा धडा शिकलो. समस्या कितीही मोठी असली तरी तुमच्यात जर इच्छाशक्ती असेल तर तुम्ही इच्छाशक्तीच्या जोरावर तिचा सामना करू शकता. ठेच लागते, वेदना होतात, पण शेवटी तुम्हीच जिंकता``. रोहमन म्हणाला की ``मी स्वतःशी खोटं बोलत नाही. आपणच आपल्यासाठी महत्त्वाचे आहोत. कधीकधी एखाद्या खास व्यक्तीची जादू की झप्पीही दिलासा देणारी ठरते. होम आयसोलेशमध्ये असताना मी कोरियन ड्रामा पाहिले. अजूनही मला खूप थकवा येतो आणि दमल्यासारखं वाटतं``. या सेशनदरम्यान रोहमननं त्याच्या बॉलिवूड (Bollywood) पदार्पणाविषयी बोलला. तसेच एका चाहत्याला उत्तर देताना म्हणाला की, ``कोरोनाचा संसर्ग होण्यापूर्वीच मी शूट पूर्ण केलं होतं. सध्या पोस्ट प्रोडक्शनची प्रक्रिया सुरू आहे. लवकरच याबाबत अधिक माहिती देईन.``
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.