मुंबई 11 एप्रिल: चित्रांगदा सिंग (Chitrangada Singh) ही बॉलिवूडमधील एक नामांकित अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. चित्रपटांसोबतच ती सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या मादक फोटो आणि व्हिडीओंमुळं अनेकदा चर्चेत असते. मात्र यावेळी ती भारतीय क्रिकेटपटू राहुल द्रविडमुळं चर्चेत आहे. तिनं राहुलला इंद्रानगरचा गुंड म्हणत त्याची फिरकी घेतली आहे. तिची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.
राहुल द्रविड (Rahul Dravid) हा क्रिकेटमधला सगळ्यात संयमी खेळाडू म्हणून ओळखला जातो. क्रिकेटच्या मैदानामध्ये राहुल द्रविडला राग अनावर झाल्याचं आपण कधीच पाहिलेलं नाही, पण आयपीएल 2021 (IPL 2021) सुरू होण्याआधी केलेल्या एका जाहिरातीमध्ये राहुल द्रविडचा पारा चांगलाच चढल्याचं दिसत आहे. 'इंदिरानगर का गुंडा हूं मै' असं म्हणत ट्रॅफिकमध्ये अडकलेला राहुल समोरच्या गाडीवर बॅटने मारत आहे. या जाहिरातीचं निमित्त साधून चित्रांगदानं राहुलची फिरकी घेतली आहे. राहुलचा हा व्हिडीओ पाहून भारतीय क्रिकेट संघातील अँग्री यंगमॅन विराट कोहली देखील थक्क झाला आहे.
अवश्य पाहा - सेटवर अभिनेत्रींची मारामारी; स्वरानं मारलेल्या लाथेमुळं अभिनेत्री झाली रक्तबंबाळ
Calm down, #IndiranagarKaGunda ! #RahulDravid #Jammy #TheWall #TheGentleman pic.twitter.com/06mcntMTC9
— Chitrangda Singh (@IChitrangda) April 11, 2021
Never seen this side of Rahul bhai pic.twitter.com/4W93p0Gk7m
— Virat Kohli (@imVkohli) April 9, 2021
राहुल द्रविडचं हे रूप क्रिकेट रसिकही पहिल्यांदाच बघत आहेत. द्रविड हा सध्या बँगलोरमध्ये एनसीएचा प्रमुख आहे. टीम इंडियाच्या नवोदितांना घडवण्याचं काम द्रविड चोखपणे करत आहे. राहुल द्रविडचेच अनेक शिष्य आता यावेळची आयपीएल गाजवण्यासाठी सज्ज झाले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.