जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / आधी सुरक्षारक्षकाला ढकलले, नंतर सोनू निगमला धक्काबुक्की; नेमकं काय घडलं? VIDEO आला समोर

आधी सुरक्षारक्षकाला ढकलले, नंतर सोनू निगमला धक्काबुक्की; नेमकं काय घडलं? VIDEO आला समोर

Sonu Nigam

Sonu Nigam

स्थानिक आमदाराच्या मुलाने ही धक्काबुक्की केल्याचा आरोप सोनू निगमने केला असून याप्रकरणी पोलिसात तक्रारही दाखल करण्यात आली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 21 फेब्रुवारी : गायक सोनू निगमला कॉन्सर्टनंतर धक्काबुक्की झाल्याचा प्रकार मुंबईतील चेंबुरमध्ये घडला. चेंबुरमध्ये एका लाईव्ह शोनंतर बाहेर पडताना सोनू निगमच्या सुरक्षा रक्षकांना मारहाण करत त्याला धक्काबुक्की करण्यात आली. स्थानिक आमदाराच्या मुलाने ही धक्काबुक्की केल्याचा आरोप सोनू निगमने केला असून याप्रकरणी पोलिसात तक्रारही दाखल करण्यात आली आहे. धक्काबुक्कीनंतर सोनू निगमच्या क्रू मेंबरला दुखापत झाल्याची माहिती समोर येतेय. तसंच आता या घटनेचा व्हिडीओसुद्धा व्हायरल होत आहे. सोनू निगमला धक्काबुक्की होण्याआधी त्याचे सुरक्षारक्षक आडवे आले होते. त्यांनी सोनू निगमला मारहाणीपासून वाचवलं. पण आमदार प्रकाश फातर्पेकर यांच्या मुलाने सुरक्षारक्षकांना पायऱ्यांवरून जोरदार धक्का दिला. त्यानंतर सोनू निगमलासुद्धा धक्का देण्यात आला.

जाहिरात

हेही वाचा : सोनू निगमला आमदाराच्या पुत्राने केली धक्काबुक्की, मुंबईत कॉन्सर्टवेळी घटना चेंबूरमध्ये सोमवारी फेस्टिव्हलचा अखेरचा दिवस होता. या फेस्टिव्हलमध्ये सोनू निगम सहभागी झाला होता. परफॉर्मन्स झाल्यानंतर तो स्टेजवरून खाली उतर होता तेव्हा काही लोक सेल्फी घेण्यासाठी एकत्र आले होते. त्यावेळी धक्काबुक्कीची घटना घडली. यामध्ये सुरक्षारक्षकाला दुखापत झाली असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. लाइव्ह कॉन्सर्टमध्ये भाग घेण्यासाठी सोनू निगम चेंबूरमध्ये होता. कार्यक्रमानंतर बाहेर पडताना चाहत्यांनी त्याच्यासोबत जबरदस्तीने सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा सोनू निगमला धक्काबुक्की झाली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात