मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /रियाचा ‘चेहरा’ चित्रपटात झळकणार; 2 मिनिटांच्या ट्रेलरमध्ये मिळाली 2 सेकंदांची जागा

रियाचा ‘चेहरा’ चित्रपटात झळकणार; 2 मिनिटांच्या ट्रेलरमध्ये मिळाली 2 सेकंदांची जागा

 हा चित्रपट गेल्या काही महिन्यांत अभिनेत्री रिया चक्रवर्तीमुळं (Rhea Chakraborty) प्रचंड चर्चेत होता. सुशांत मृत्यू प्रकरणात अडकलेली ही अभिनेत्री चेहरेमध्ये झळकणार का? हे जाणून घेण्यास प्रेक्षक उत्सुक होते.

मुंबई 18 मार्च: बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा नवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. सस्पेन्सनं भरलेल्या या चित्रपटाचं नाव ‘चेहरे’ (Chehre) असं आहे. हा चित्रपट गेल्या काही महिन्यांत अभिनेत्री रिया चक्रवर्तीमुळं (Rhea Chakraborty) प्रचंड चर्चेत होता. सुशांत मृत्यू प्रकरणात अडकलेली ही अभिनेत्री चेहरेमध्ये झळकणार का? हे जाणून घेण्यास प्रेक्षक उत्सुक होते. अखेर या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. या ट्रेलरमध्ये रियाची झलक पाहायला मिळत आहे.

चित्रपटाचा ट्रेलर हा 2 मिनिटं 22 सेकंदांचा आहे. यामध्ये अमिताभ बच्चन आणि इमरान हाशमी यांची जबरदस्त जुगलबंदी पाहायला मिळत आहे. सोबतच इमरानचे काही इंटिमेट सीन देखील दाखवण्यात आलं. अन् ट्रेलरच्या शेवटी दोन सेकंदांसाठी रियाची झलक दाखवण्यात आली. अर्थात तिची ही झलक पाहून काही चाहते मात्र नाराज झाले अन् त्यांनी सोशल मीडियाद्वारे आपली नाराजी व्यक्त केली.

अवश्य पाहा - ‘त्यानं मला फसवलं तर...’; कियारा पडली आलिया भट्टच्या एक्स बॉयफ्रेंडच्या प्रेमात

" isDesktop="true" id="531827" >

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात रिया चक्रवर्ती प्रमुख गुन्हेगार असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळं तिच्या नकारात्मक प्रतिमेचा प्रभाव चित्रपटावर पडू नये म्हणून निर्मात्यांनी तिला  प्रमोशनमध्ये देखील सामिल केलेलं नाही. सुशांत प्रकरणात रियाची अद्याप निर्दोष सुटका झालेली नाही. या प्रकरणात आता एक नवा ट्विस्ट आला आहे. एनसीबीनं न्यायालयासमोर 30 हजार पानांचं आरोपपत्र दाखल केलं. एनसीबीचे प्रमुख समीर वानखेडे यांनी स्वतः हे आरोपपत्र सादर केलं. या आरोपपत्रात रिया चक्रवर्ती आणि तिच्या भावासोबतच आणखी 30 जणांनी नावं आहेत. शिवाय या प्रकरणी काही ड्रग्ज पेडलर्सला देखील एनसीबीनं अटक केली आहे.

First published:

Tags: Amitabh Bachchan, Bollywood, Crime, Rhea chakraborty, Teen chehre