मुंबई, 26 एप्रिल- अभिनेता दिग्दर्शक प्रसाद ओक (prasad oak ) याने ‘चंद्रमुखी’ (chandramukhi) या आगामी चित्रपटाची घोषणा केल्यापासून सोशल मीडियावर फक्त आणि फक्त चंद्रमुखीची चर्चा रंगलेली आहे. आधी चंद्राची भूमिका कोण साकारणार याबद्दल चर्चा रंगलेली होती. आता चंद्राच्या नृत्यकौशल्याची सगळीकडे चर्चा रंगलेली आहे. लवकरच हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. चंद्राची भूमिका या सिनेमात अमृता खानविलकर**(amruta khanvilkar)** साकारताना दिसत आहे. आता तिच्या समोर अभिनेत्री प्राजक्ता माळी (prajakta mali) उभी ठाकली आहे. या दोघींमध्ये ‘चंद्रा’वर रंगलेली जुगलबंदी पाहायला मिळणार आहे. अभिनेत्री अमृता माळीन प्राजक्ता माळीसोबतचा फोटो पोस्ट करत म्हटलं आहे की, चंद्राला साथ लाभणार नैना ची @prajakta_official आणि मग रंगणार कधी न पाहिलेला ऐकलेला सवाल जवाब ऐकाऽऽऽऽऽऽऽगुरु ठाकूर यांचे शब्दआणि अजय अतुल यांचा संगीत साज…!!! ChandramukhiSong #SawalJawab #SongOutNow - Link In The Bio & Story. वाचा- ‘आत्तापर्यंतची झी ची सर्वांत फालतू सीरियल..’ मन उडू उडू झालं मालिकेवर भडकले प्रे यापूर्वी या चित्रपटातील ठुमकेदार लावणी, तरल प्रेमगीत, कृष्णप्रेम व्यक्त करणाऱ्या, श्रृंगाराने सजलेल्या चंद्राची बैठकीची लावणी आपल्या समोर आली आहे. मात्र, आता सवाल जवाबचा फड रंगणार आहे. आपल्या नृत्याने सर्वांना घायाळ करणारी ‘चंद्रा’ आता सवाल जवाबचा तडका घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. यात अमृता खानविलकर आणि प्राजक्ता माळीमध्ये रंगलेली जबरदस्त जुगलबंदी पाहायला मिळत आहे.
प्रसाद ओक दिग्दर्शित, चिन्मय मांडलेकर लिखित या चित्रपटात अमृता खानविलकर, आदिनाथ कोठारे, मृण्मयी देशपांडे, मोहन आगाशे, राजेंद्र शिसतकर, समीर चौघुले, अशोक शिंदे, नेहा दंडाळे, राधा सागर यांच्यासह अनेक कलाकार आहेत. तर चित्रपटाचे छायाचित्रण संजय मेमाणे यांनी केले आहे. वाचा- ‘हल्ली सिनेमात काम इन्स्टा फॉलोअर्सची संख्या पाहून मिळते’ प्राजक्ताची पोस्ट चंद्रमुखी हा सिनेमा लावणीसम्राज्ञीच्या आयुष्यावर बेतला आहे. यात अमृता खानिलकर चंद्राची भूमिका साकारताना दिसत आहे. तर अभिनेता आदिनाथ कोठारे दौलतराव देशमाने ह्या ध्येयधुरंदर राजकारण्याच्या भूमिकेत पाहायला मिळतोय. सध्या सर्व स्तारातून अमृतानं साकारलेल्या चंद्राचे कौतुक होत आहे.
‘चंद्रा’ गाण्याची सोशल मीडियावर देखील चांगलीच क्रेझ पाहायला मिळत आहे. या गाण्याला रिलीज झाल्याच्या काही दिवसातच 2 मिलियन पेक्षा (2 Million views ) जास्त प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. सोशल मीडियावर या गाण्यावर विविध रील्स पाहायला मिळतात. प्रेक्षकांना देखील सिनेमा पाहण्याची उत्सुकता लागली आहे.