आज देशभरात होळी-रंगपंचमीची धूम सुरु आहे. सगळीकडे रंगाची उधळण केली जात आहे.यामध्ये मराठी मनोरंजनसृष्टीतील कलाकारसुद्धा मागे नाहीत. अनेक मराठी कलाकारांनी आपल्या होळी सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत.
'चला हवा येऊ द्या' फेम हास्य कलाकार भाऊ कदम यांनी आपल्या होळी सेलिब्रेशनचा सुंदर फोटो शेअर केला आहे.
'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्री हृता दुर्गुळेने यंदाची होळी आपल्या होणाऱ्या पतीसोबत साजरी केली आहे.
'येऊ कशी तशी मी नांदायला' मालिकेतील स्वीटू अर्थातच अन्विता फलटणकरनेसुद्धा होळीमध्ये धम्माल केली आहे.
'सुंदर मनामध्ये भरली' फेम अभिनेत्री अक्षया नाईकने आपल्या होळी सेलिब्रेशनचा फोटो शेअर केला आहे. यामध्ये लतिका रंगात न्हाऊन निघाली आहे.
'माझ्या नवऱ्याची बायको' फेम अभिनेता अभिजित खांडकेकरनेसुद्धा आपली पत्नी आणि मित्रांसोबत होळीचा आनंद घेतला आहे.
'मन उडू उडू झालं' मालिकेतील दीपूची बहीण सानिका अर्थातच अभिनेत्री रीनानेसुद्धा होळीचा जबरदस्त फोटो शेअर केला आहे.