अभिनेत्री रिंकू राजगुरू नेहमीच चर्चेत असते. ती सतत आपले प्रोजेक्ट्स आणि लूक यामुळे चर्चेचा विषय बनलेली.रिंकूने अल्पावधीतच मनोरंजनसृष्टीत आपला चांगला जम बसवला आहे.
रिंकू राजगुरू सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत व्हिडीओ आणि फोटोंच्या माध्यमातून चाहत्यांना भेटत असते.
चाहतेही रिंकूला भरभरून प्रेम देत असतात. रिंकूच्या प्रत्येक पोस्टला प्रचंड लाईक्स आणि कमेंट्स देत असतात.
रिंकूने नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपले काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो फारच खास आहेत. कारण यामध्ये रिंकूने आपल्या आज्जीची साडी परिधान केली आहे.
पिवळ्या रंगाची काठपदर साडी नेसून रिंकू फारच सुंदर दिसत आहे. रिंकूने या ट्रॅडिशनल लूकमध्ये सर्वांना विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
चाहते या फोटोंवर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया देत आहेत. तसेच चाहते अभिनेत्रीचं कौतुक देखील करत आहेत.
रिंकू सध्या हिंदी वेबसिरीज आणि चित्रपटांमध्ये सक्रिय झाली आहे. रिंकूच्या अभिनयाचं सर्वांकडूनच कौतुक होत आहे.