Cannes Film festival मध्ये या वर्षी दीपिका पादुकोणच्या लुकची चर्चा आहे. पण दीपिकाच नव्हे तर आणखीही बऱ्याच भारतीय सेलेब्रिटी कानच्या रेड कार्पेटवर या वर्षी झळकत आहेत.
यावेळी अभिनेत्री उर्वशी रौतेलाने सफेद रंगाचा प्रिसेंस गाऊन घातला होता. प्रिंसेस गाऊनमध्ये उर्वशी भलतीच सुंदर दिसत होती. सोशल मीडियावर उर्वशीच्या फोटोला चाहत्यांनी पसंती दर्शवली आहे.
अभिनेत्री तमन्ना भाटीया ब्लॅक अँड व्हाइट बॉल गाऊन कॅरी करताना दिसली. तमन्नाच्या पोझेसवर तिचे चाहते फिदा झालेत.
अभिनेत्री तमन्ना Cannes Film festival साठी फार उत्साही होती. "मला कान्स फेस्टिव्हलमध्ये येण्याची संधी मिळाली ही माझ्यासाठी फार सन्मानाची बाब आहे. मी या फेस्टिव्हलसाठी फार उत्साही" असल्याचे तमन्नाने ANI शी बोलताना सांगितलं.
अभिनेत्री पूजा हेगडेने देखील इन्स्टाग्रामवर तिचा व्हिडीओ शेअर केला. पूजा देखील कान्स फेस्टिव्हलसाठी फार सुंदर रेडी झाली होती. ब्लॅक अँड व्हाइट ड्रेसमध्ये पूजा फार ग्लॅमरस दिसत होती.
दीपिका पादूकोणने यावेळी सर्वांचे लक्ष वेधलं ते म्हणजे तिच्या ब्लॅक अँड गोल्डन साडीने. त्यात स्ट्रॅपलेस ब्लॉऊजने दीपिकाच्या लूकला चार चाँद लावले.
दीपिका या फेस्टिव्हलमध्य 8 सदस्यीय ज्यूरी मेंबर आहे. दीपिकासह यंदाच्या Cannes Film festival मध्ये वाणी त्रिपाठी, प्रसून जोशी, संगीतकार आर. माधवन, नवाजुद्दीन सिद्धीकी इत्यादी कलाकार सहभागी झाले होते.