हे पेंटिंग पंजाबमधील धुरी याठिकाणी जन्मलेले प्रसिद्ध कलाकार मनजीत बावा (1941-2008) यांनी बनवले आहे. या पेंटिंगची किंमत 4 कोटी रुपये असल्याचे बोलले जात आहे, ही किंमत ऐकून हैराण झालात ना? इतक्या किमतीत, तुम्ही मुंबईतील एखाद्या फॅन्सी ठिकाणी 2BHK सहज खरेदी करू शकता किंवा तुम्ही एखाद्या आवडत्या ठिकाणी हॉलिडे होम खरेदी करू शकता. हे वाचा-'कंगनाकडून पद्मश्री परत घ्या', विरोधी पक्षांसह भाजप नेत्यांचाही संताप दरम्यान, अमिताभ बच्चन यांनीही त्यांच्या घरात Bull Painting असण्याचे महत्त्व सांगितले. ट्वीटमध्ये त्यांनी असे म्हटले आहे की, "मित्रांनो, बैलचित्र हे शक्ती, ताकद, वेग आणि आशावादाचे प्रतीक आहे. ते ऑफिस किंवा घराच्या कोपऱ्यात ठेवल्याने एखाद्याच्या आर्थिक स्थितीत बुल रन येण्यास मदत होते. हे परम लाभ, यश आणि वाढीव समृद्धीचे प्रतीक आहे."T 4087 - Some picture sitting positioning never change, even through time .. ❤️❤️ pic.twitter.com/Vs8D1MAEtn
— Amitabh Bachchan (@SrBachchan) November 5, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.