मुंबई, 18 जानेवारी- चित्रपट निर्माते बोनी कपूर (Boney Kapoor) आपली दिवंगत पत्नी श्रीदेवी (Sridevi) यांना खूप मिस करत आहेत. श्रीदेवी यांच्या अकाली निधनानंतर बोनी कपूर हे आपल्या पत्नीच्या आठवणी सोशल मीडियावर शेअर करत असतात. श्रीदेवी यांच्यासोबतचे काही खास फोटो आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर करत असतात. आता असाच एक जुना फोटो बोनी यांनी शेअर केला आहे. यामध्ये श्रीदेवी अतिशय सुंदर दिसत आहेत.
बोनी कपूर यांनी शेअर केलेल्या फोटोला कॅप्शनही दिले आहे. “लखनऊमध्ये सन 2012 मध्ये सहारा शहरात दूर्गा पूजेचा उत्सव साजरा केला जात आहे,” अशी आठवण बोनी यांनी शेअर केली आहे. अर्थात2012 मध्ये श्रीदेवी या लखनऊमध्ये दूर्गा पूजेसाठी गेल्या होत्या हा फोटो तेव्हाचा आहे. यामध्ये श्रीदेवी यांच्या भांगात, गालावर आणि पाठीवरही सिंदूर लावलेला दिसत आहे. विशेष म्हणजे पाठीवर सिंदूरनेच इंग्रजीत बोनी कपूर यांचे नाव लिहले आहे.
वाचा-'पुष्पा' स्टार अल्लू अर्जुनची पत्नी सुंदरतेत बालिवूड अभिनेत्रींना देते मात!
श्रीदेवी यांचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. चाहते या फोटोवर कमेंट करून श्रीदेवी यांच्या आठवणींना उजाळा देत आहेत. तर एका चाहत्याने लिहले आहे की, खऱ्या प्रेमाला परमेश्वराने वेगळे केले. यावर इतर चाहत्यांना रडण्याची इमोजी वापरून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
View this post on Instagram
दरम्यान, बोनी कपूर यांनी बॉलिवूड जगताला काही खास चित्रपट दिले आहेत. मिस्टर इंडिया’, ‘जुदाई’, ‘नो एंट्री’ या सारख्या लोकप्रिय चित्रपटाची निर्मिती बोनी कपूर यांनी केली आहे. बोनी यांच्या संपूर्ण कपूर कुटुंबीयांचाच बॉलीवूडमध्ये दबदबा आहे. बोनी कपूर यांचे भाऊ अनिल कपूर आणि संजय कपूर अभिनेते आहेत. तर मुलगा अर्जुन कपूर आणि मुलगी जान्हवी कपूरही चित्रपटांत मुख्य भूमिकेत दिसत आहेत.
वाचा-प्रियांका चोप्राच्या मनात पहिल्यांदा मंगळसूत्र घातल्यानंतर आला होता 'हा' विचार
अर्जुन बोनी यांची पहिली पत्नी मोना कपूर यांचा मुलगा आहे. तर जान्हवी ही दुसरी पत्नी श्रीदेवी यांची मुलगी आहे. बोनी कपूर यांना एकूण चार अपत्ये असून अर्जुन, जान्हवी यांच्याशिवाय खुशी आणि अंशुला या मुलीही आहेत. बोनी यांनी 1996 मध्ये पहिली पत्नी मोना यांना घटस्फोट देऊन फिल्मी जगतातील सौंदर्यवती श्रीदेवी यांच्याबरोबर विवाह केला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood News, Entertainment, Sridevi, Sridevi death anniversary