मुंबई, 22 फेब्रुवारी: बॉलिवूड अभिनेत्री शर्लिन चोप्रा नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. मात्र यावेळी ती आपल्या अश्लिल व्हिडीओ प्रकरणामुळं अडचणीत सापडली आहे. तिच्याविरोधात पॉर्न व्हिडीओ पब्लिश केल्याचे आरोप करण्यात आले आहेत. अर्थात हे आरोप शर्लिनने मात्र फेटाळले. उलट या प्रकरणी न्याय मिळवण्यासाठी तिनं आता मुंबई उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे.
सेवानिवृत्त अधिकारी मधुकर केनी यांनी 19 फेब्रुवारी रोजी शर्लिन विरोधात पोलीस तक्रार दाखल केली होती. शर्लिनचं नाव गुगल सर्च इंजिनवर लिहिलं असता अश्लिल कॉन्टेट समोर येतो असा आरोप त्यांनी केला होता. मात्र पोलीस या प्रकरणाची रितसर चौकशी करत असल्यामुळं तिला अटक केली गेली नाही. २२ फेब्रुवारी पर्यंत आम्ही तिला अटक करणार नाही असं आश्वासन पोलिसांनी न्यायालयासमोर दिलं होतं. आता ही चौकशीची मुदत संपलेली असून आज न्यायालायत या प्रकरणी सुनावणी होणार आहे.
अवश्य पाहा - अभिनेत्री अनिता हसनंदानी आणि पती रोहितनं बाळाचं केलं मजेशीर स्वागत, पाहा VIDEO
दुसरीकडे शर्लिनने मात्र तिच्यावर केले जाणारे आरोप फेटाळून लावले आहेत. मी एका सबस्क्रिप्शन बेस्ड आंतरराष्ट्रीय पोर्टलसाठी हे व्हिडीओ शूट केले होते. परंतु कोणीतरी हे व्हिडीओ फ्री वेबसाईट्सवर अपलोड केले आहेत. माझ्या व्हिडीओंची पायरसी केली जात आहे. अन् सायबर तज्ज्ञांनी या प्रकरणाची चौकशी करावी अशी विनंती तिनं कोर्टाला केली आहे. आज उच्च न्यायालयात या प्रकरणी सुनावणी होणार आहे. दरम्यान शर्लिनचे चाहते या प्रकरणाच्या निकालाची वाट पाहात आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Case in india, Crime, Crime news, Entertainment, Porn video